Latur Accident Saam Tv
महाराष्ट्र

Latur Accident: लातूरमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात, दोन महिलांसह तिघांचा जागीच मृत्यू

Saam Tv

संदीप भोसले, साम टीव्ही, प्रतिनिधी

लातूरमध्ये एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. कार आणि ट्रकच्या अपघातात दोन महिलांसह एका अल्पवयीन मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किनगाव-अंबाजोगाई महामार्गावरच्या दगडवाडी येथे हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात विजयमला शिरसाट वय (45) सावित्री हरी शिरसाठ आणि एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किनगावकडून जोडवाडीकडे जात असताना भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. तसेच या घटनेची अधिक माहिती घेत आहेत.

शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ भीषण अपघात, पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

दरम्यान, धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दसवेल फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. पिकअप व्हॅन आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मयतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.

जखमींना तातडीने धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून ही सर्व मंडळी आपल्या घराकडे परतत होते त्यादरम्यान भरधाव पिकप ने या वाहनाला धडक दिली आहे. त्यामुळे हा भीषण अपघात झाला असून पिकप वाहनाचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT