saam tv
महाराष्ट्र

रुपाली चाकणकरांना अशोक खरात प्रकरण भोवलं; महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही जाणार

Rupali Chakankar Resignations: अशोक खरात वादाच्या पार्श्वभूमीवर रूपाली चाकणकर यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या पदावरूनही पायउतार होण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

  • अशोक खरात प्रकरणामुळे राजकीय दबाव वाढला

  • सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातसोबतचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. अशोक खरातसोबत व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमुळे चाकणकरांना राजीनामा द्यायची वेळ आली. या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा पत्र दिलं. आता हाती आलेल्या माहितीनुसार चाकणकरांचं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदही जाणार आहे. त्यांना या पदाचाही राजीनामा द्यावा लागणार आहे. अशोक खरात प्रकरणामुळे आरोप होत असल्याने रुपाली चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या होत्या.

परंतु, चाकणकरांच्या राजीनाम्याचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. अखेर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. शुक्रावार २० मार्च रोजी संध्याकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला.

आता हाती आलेल्या माहितीनुसार, त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देतील.भोंदूबाबामुळे रुपाली चाकणकरांवर दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा द्यायची वेळ आल्याची चर्चा आहे. अशोक खरातचे रोज नवनवीन कांड समोर येत आहेत. गुंगीचं औषध प्यायला लावून, त्यांना संमोहित करून खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. इतकेच नाहीतर खरात महिलांना आपली लघवी प्यायला देत. तर काहींना तो व्हायग्रा गोळीचं पाणी प्यायला देत असायचा, असा आरोप केला जातोय.

रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये चाकणकर या अशोक खरातला थेट विठ्ठलाची उपमा देताना दिसत आहेत. सोबतच चाकणकर आणि अशोक खरात यांचे काही फोटोही व्हायरल झालेत. रुपाली चाकणकर या अशोक खरातने स्थापन केलेल्या ट्रस्टच्या संचालिका आहेत. गेल्या वर्षी एका महिलेच्या लैंगिक छळ प्रकरणी रुपाली चाकणकरांनी त्या महिलेला मदत करण्याऐवजी अशोक खरातला मदत केल्याचं समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga For Belly Fat Loss: पोटावरची चरबी मेणासारखी वितळेल, घरीच करा हे ५ सोपे योगा प्रकार

भल्या पहाटे पुन्हा भूकंपाचे हादरे; जमीन थरथरली, लोक घर सोडून पळाले

Accident: मध्यरात्री हिट अँड रनचा थरार, भरधाव वाहनाची दुचाकीला धडक; चाकाखाली चिरडून दोघांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: भिवंडी शहरातील फातिमानगर येथील भंगाराच्या गोदामाला आग

Company Fire: पगार कमी आल्यानं राग अनावर झाला; संतापलेल्या कर्मचाऱ्यानं कंपनीच जाळली

SCROLL FOR NEXT