Speculation intensifies over the next Maharashtra Women’s Commission chairperson after recent political developments. saam tv
महाराष्ट्र

राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद कोणाला मिळणार? दोन नावांची चर्चा, कोण आहेत 'त्या' महिला नेत्या?

Maharashtra Womens Commission Chief : रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षांविषयी चर्चांना उधाण आले आहे. दोन महिला नेत्या या शर्यतीत आघाडीवर आहेत.

Bharat Jadhav

  • रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपद रिक्त

  • दोन महिला नेत्यांची नावं चर्चेत

  • लवकरच नवीन अध्यक्ष जाहीर होण्याची शक्यता

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातशी निकटचे संबंध ठेवल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांना महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपद कोणाला मिळणार, याची चर्चा रंगत आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, दोन महिला नेत्यांच्या नावाची चर्चा जोरात होत आहे. त्यामुळे अध्यक्षपद कोणाला मिळणार, त्या महिला नेत्या कोण हे जाणून घेऊ.

अशोक खरात अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करायचा. भविष्य सांगण्याच्या आणि दोष निवारण करण्याच्या बहाण्याने खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. पोलिसांना त्याच्याकडून महिलांसोबत अश्लील चाळ करत असल्याचं व्हिडिओ मिळाली आहेत. एका अत्याचाप्रकरणाचा तपास करताना अशोक खरातचे जुने प्रकरणं समोर आली आहेत.

याप्रकरणात त्याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान अशोक खरातच्या संपर्कात अनेक राजकीय नेते होते, त्यातील एक होत्या रुपाली चाकणकर. त्या त्यांच्या एका ट्रस्टच्या सदस्यादेखील होत्या. रुपाली चाकणकरांचे खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागलाय.

रुपाली चाकणकर यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पक्षातील आणि विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात होती. खरात प्रकरणात रुपाली चाकणकर या एकट्या पडल्या होत्या.त्यांना पक्षातूनही कोणीच पाठिंबा दिला नाही. रुपाली चाकणकर यांनी खरातला त्याच्या दुष्कृत्यात पाठीशी घातल्याचे आरोप चहूबाजूने करण्यात आले.

खरात प्रकरणाची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्त कारवाईचे आदेश पोलिसांना दिले. दरम्यान रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. माझा खरात याच्या ट्रस्टबाबत संबंध आहे. मात्र त्याच्या कारनाम्याबाबत मला माहिती नाही, असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न चाकणकर यांनी केला. परंतु रुपाली चाकणकर यांची बाजू मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेटाळून लावली. त्यांना राजीनामा देण्यास सांगितलं. रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

आता या महिला आयोगाच्या अध्यक्षा होणार यावर चर्चा रंगली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी पक्षातील दोन महिला नेत्याच्या नावाची चर्चा होऊ लागलीय. वैशाली नागवडे, आणि प्रतिभा शिंदे यांच्या नावाची चर्चा होत आहे. या दोघांपैकी एका नेत्याकडे महिला आयोगाचं अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाणार आहे.

प्रतिभा शिंदे कोण आहेत?

लढवय्या स्वभाव असलेल्या प्रतिभा शिंदे यांनी अनेक जन आंदोलनात सहभाग घेतला आहे. त्या मुळच्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत. नर्मदा धरण्याच्या विरोधातील संघर्षात त्यांनी सहभाग घेतला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता.

वैशाली नागवडे

नागवडे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नेत्या आहेत. पवार कुटुंबीयांतील प्रत्येक नेत्यांशी त्यांचे घनिष्ट संबंध आहेत. त्यांनी पंचायत समितीचे सदस्य, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद, महानंदाचे अध्यक्षपद, पंचायतराज कमिटीचे अध्यक्षपद, प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. राष्ट्रवादीतील सर्वाधिक मदत करणाऱ्या पदाधिकारी म्हणून त्यांचे नाव चर्चेत राहिले आहे. महिला बचत गट, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : झटपट वजन कमी करायचंय? रोज सकाळी करा 'हा' हेल्दी नाश्ता, पोट दीर्घकाळ भरलेले राहील

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी आजपासून प्रचाराला सुरूवात

IPL CSK vs DC: अखेर चेन्नई सुपर किंग्सनं उघडलं विजयाचं खातं; सॅमसन-ओव्हरटन ठरले हिरो

Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांच्या नातनं दिली आजीच्या प्रकृतीची अपडेट; काय म्हणाली जनाई?

Sahyadri Express Loot: सिग्नलमध्ये बिघाड करुन सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले

SCROLL FOR NEXT