Sanjay Gaikwad On Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Gaikwad: राऊत यांच्या मायचा #@XXX..., संजय गायकवाड यांची जीभ घसरली

Sanjay Gaikwad On Sanjay Raut: सामनाच्या अग्रलेखातून संजय गायकवाड यांनी कॅन्टिन मॅनेजरला केलेल्या मारहाणीवरून सडकून टीका केली आहे. यावर आता उत्तर देताना संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहे.

Priya More

आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये जेवणावरून वाद झाला होता. यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी मॅनेजरला मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावरून संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. यावरूनच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली. यावरून संतप्त होत संजय गायकवाड यांनी राऊतांना उत्तर देताना त्यांच्यावर सडकून टीका केली. संजय राऊत यांच्याबाबत बोलताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली. संजय गायकवाड यांनी मारहाण केलेला कॅन्टीनचा मॅनेजर शेट्टी आहे. यावरूनच संजय गायकवाड यांनी संजय राऊतांना टोला लगावला. 'मराठी मराठी करणाऱ्या संजय राऊतांना शेट्टींचा पुळका आला का?', असा सवाल संजय गायकवाड यांनी केला.

आजच्या सामनाच्या अग्रलेखातून संजय गायकवाड यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. संजय गायकवाड यांनी सांगितले की, 'बाळासाहेब ठाकरे यांनी पहिले आंदोलन जे केलं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधात केले होते. त्यांनी डान्स बार, लेडीज बार लावून संस्कृती बिघडवली. मी ज्याला मारहाण केली तो शेट्टीच आहे. इकडे मराठी मराठी करणाऱ्यांना पुळका आला का त्या शेट्टींचा? संजय राऊताच्या मायचा XXX आहे का तो शेट्टी?' , असा सवाल संजय गायकवाड यांनी केला.

तसंच, 'त्याला मी आतंकवादी वाटतो का? तो आमच्या लोकांना बोगस जेवण खाऊ घालत होता. आज ते सिद्ध झाले. त्या हॉटेलवाल्याने ७९ प्रकाराच्या नियमाचे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले. हा माझा विजय आहे. त्याला कुणी वाचा फोडत नव्हते. घंटा कुणी मांजराच्या गळ्यात बांधत नव्हते तो मी बांधला. मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता. इच्छा नसताना मला कायदा हातात घ्यावा लागला.', असे संजय गायकवाड यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. मला सीएम करा आमचा गट भाजपामध्ये विलीन करतो असे एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांना सांगितल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड म्हणाले की, 'संजय राऊत हा एक नंबर नालायक होपलेस माणूस आहे. यांच्या कोणत्या भागात ट्रान्स्लेटर फिट आहे की याला बातम्या कुठून लागतात. पक्ष वाढण्यासाठी एकनाथ शिंदे जीवाचे रान करून फिरतात. हे का पक्ष विलीन करण्यासाठी बोलतील. संजय राऊत बोलला की लोक टीव्ही बंद करतात.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Municipal Corporation: २.५ लाख भटक्या कुत्र्यांना मायक्रोचिप! काय होणार बदल? VIDEO

Hema Malini: ड्रीम गर्ल ते बसंती...; हेमा मालिनीच्या 'या' भुरळ पाडणाऱ्या खास भूमिका

Maharashtra Live News Update: सुप्रिया सुळे बैठकीला थेट दुचाकीवरून पोहचल्या

Truck Accident: भीषण अपघात; बोगद्याजवळ ट्रक उलटला,एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू

Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, GR बाबतच्या हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान

SCROLL FOR NEXT