अबब ! घरात लावली गांजाची झाडे  अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

अबब ! घरात लावली गांजाची झाडे

व्यसनाच्या मोहापायी स्वतःच्या घरातच अवैधरित्या गांज्याची झाडांची लागवड करणे भंडारा जिल्ह्यातील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित घोरमारे

भंडारा - माणसाला व्यसन कुठे घेऊन जाईल याचा काही नेम नाही. आपल्या व्यसनाच्या मोहापायी स्वतःच्या घरातच अवैधरित्या गांज्याची झाडांची लागवड करणे भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील परसोडी-पवार गावातील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. लाखनी पोलिसांनी आरोपी घरमालकास अटक केली आहे. Cannabis plants planted in the house

युक्तेश्वर आत्माराम सूर्यवंशी (वय 68) वर्ष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या घरातून 5 ते 7 फुटाची 6 गांजाची झाडे व एकूण 6 किलो 284 ग्रॅम वजनाची पाने असा 8 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

पोलिसांकड़ून मिळालेल्या माहिती नुसार परसोडी-पवार गावातील युक्तेश्वर आत्माराम सूर्यवंशी यांना गांजा सेवनाची आवड असून त्यांनी आपल्या घराच्या अंगणात अवैधरित्या गांज्याची झाडे लावली होती. गांजाच्या उग्र वासामुळे गावातील पोलीस पाटलांना या प्रकाराबद्दल माहिती समजताच त्यांनी या प्रकाराबाबत लाखनी पोलिसांना कळवले. दोन पंचांच्या समक्ष पोलिसांनी आरोपीच्या घरी धाड मारली असता, त्याच्या घराच्या अंगणात अवैधरित्या लागवड केलेली 5 ते 7 फुटाची 6 गांजाची हिरवी झाडे आढळून आली.

घराची अधिक तपासणी केली असता एका खोलीत गांजाची पाने (एकूण वजन 6 किलो 284 ग्रॅम) आढळून आली. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपी युक्तेश्वर आत्माराम सूर्यवंशी याच्या विरुद्ध कलम 20 NDPS ACT 1985 नुसार गुन्हा नोंद करत त्याला अटक केली आहे. पुढील तपास लाखनी पोलिस करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : धक्का लागल्यानं डोकं सटकलं, चालकावर धारदार शस्त्रानं हल्ला; कल्याणमध्ये रक्तरंजित थरार!

Maharashtra News Live Update: बारामतीत विहिरीचे खोदकाम करताना भीषण दुर्घटना! दडी कोसळून दोघांचा जागीच मृत्यू

Dussehra Horoscope: दसऱ्याला 3 राशींचं नशीब चमकणार! अडकलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत, पैशाच्या समस्या दूर होणार

Maharashtra : महाराष्ट्राच्या जवळच लपली आहेत 'ही' ४ सुंदर पर्यटन स्थळे; फिरा, खा अन् मनसोक्त एन्जॉय करा!

9 Flavours Of Panipuri: 9 प्रकारची पाणीपुरी तुम्ही कधी खाल्ली आहे का?

SCROLL FOR NEXT