abdul Sattar Saam Tv
महाराष्ट्र

TET Scam : दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द? अब्दुल सत्तार यांनी दिले स्पष्टीकरण

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद: राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेत (TET Scam) घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी परीक्षा परिषदेकडून गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत ७ हजार ८७४ विद्यार्थ्य्यांच्या नावाचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या यादीत आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन्ही मुलींची नावे असल्याची चर्चा सुरू आहे, यावर आज आमदार सत्तार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या दोन्ही मुलींची नावे या यादीत आल्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख अशी या परीक्षार्थींची नावे आहेत.

या प्रकरणावर आता आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या मुलींची नावे या यादीत असण्याचा प्रश्नच येत नाही, असा दावा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला आहे. माझ्या मुली २०२० मध्ये टीईटी अपात्र झाले आहेत. त्याचे पुरावे माझ्याजवळ आहेत. त्यामुळे मला बदनाम करण्यासाठी काहीतरी हा सगळा प्रकार केल्याचा अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांनी दावा केला आहे.

'माझ्या मुलींनी शाळेत कुठलीही सुविधा घेतलेली नाही, पगार घेतले नाहीत आणि मी स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शासनाच्याद्वारे करणार आहे. मला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचेही अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT