Satyajit Tambe Nashik News Saam TV
महाराष्ट्र

Satyajit Tambe : निलंबन मागे घेतलं तर पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का? सत्यजित तांबे स्पष्टच बोलले

पत्रकारांनी सत्यजित तांबे यांना काँग्रेसमधून तुमचं निलंबन मागे घेतलं तर पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला.

साम टिव्ही ब्युरो

Satyajit Tambe News : सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी विजय मिळवला. काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर तांबेंनी अपक्ष फॉर्म भरत आपला विजय खेचून आणला. दरम्यान, सत्यजित तांबे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चेचं त्यांनी खंडण केलं आहे.   (Latest Marathi News)

सत्यजित तांबे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच आज नाशकात पत्रकारपरिषद घेतली. या पत्रकारपरिषदेत त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. सत्यजित तांबे म्हणाले, 'मागील महिनाभराच्या काळात आमच्या कुटुंबावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आमचं कुटुंब सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात आहे.आम्ही पक्षासाठी निष्ठेनं काम केलं. विविध आव्हानात्मक परिस्थितीत आम्ही काम केलं'. (Maharashtra Political News)

'युवक काँग्रेससाठी काम करताना माझ्यावर ५० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे मला पासपोर्टही मिळत नव्हता. मी चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता आहे. मात्र, तरीदेखील पक्षाने माझी दखल घेतली नाही, मला डावलण्यात आलं, असा आरोपही सत्यजित तांबे यांनी काँग्रेसवर केला.

त्याचबरोबर मी काँग्रेसकडूनच (Congress) फॉर्म भरला होता, पण वेळेवर एबी फॉर्म मिळाला नसल्याने माझी उमेदवारी ही अपक्ष म्हणूनच झाली, असा गौप्यस्फोटही तांबे यांनी केला आहे. पक्षात, संघटनेत मला संधी मिळावी, यासाठी मी वारंवार मागणी केली. मात्र, मला संधी नाकारली, असंही तांबे म्हणाले.

वडिलांच्या जागेवर तुम्ही निवडणूक लढवा, असं सांगण्यात आलं. अखेर आम्ही तो निर्णय घेतल्यानंतरही प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडून दोन वेळा चुकीचे एबी फॉर्म पाठवण्यात आले. त्यामुळेच ऐनवेळी मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय़ घेतला, असं सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

सत्यजित तांबे यांनी या पत्रकारपरिषदेत एक मोठी घोषणा केली आहे. निवडून आल्यानंतर मी आता अपक्षच राहणार असून मला ज्या मतदारांनी निवडून दिले आहे. त्यांच्या विकासासाठी मी काम करणार असल्याचं सत्यजित तांबेंनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पत्रकारांनी सत्यजित तांबे यांना काँग्रेसमधून तुमचं निलंबन मागे घेतलं तर पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सत्यजित तांबे म्हणाले मी मनातून अजूनही काँग्रेसमध्येच आहे. पण पक्षाने माझे निलंबन केल्यामुळे मी ही निवडणूक अपक्ष लढवली आहे. आता या जर तर च्या गोष्टी आहे, असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नांदगावमधून सुहास कांदे विजयी

Aaditya Thackeray: दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; वरळीतून आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा आमदार

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

Dheeraj Deshmukh: लातूर ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का, धीरज देशमुख यांचा पराभव

Vastu Tips : घराची तोडफोड न करताही दूर होऊ शकतो वास्तूदोष, जाणून घ्या सोपे उपाय

SCROLL FOR NEXT