नंदुरबार: गावात रस्त्याचं काम सुरु असताना या ठिकाणी कामासाठी लागणारी अनेक महागडी सामग्री पडून होती. रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या मोठ्या लोकंडी प्लेट, रोडसह अन्य काही गोष्टी कामाच्या ठिकाणी होत्या. याच ठिकाणी सहा चोरटे एक पिकअप घेऊन हे सर्व सामान पळविण्याच्या तयारीत होती. मात्र, गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरांचा मनसुभा उधळला गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धोजापानी या गावामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Gramsadak Yojana) रस्ते व पुलाचे काम सुरू आहे. कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोखंडी प्लेट व सामग्री पडून आहे. या ठिकाणी असलेले सामान चोरण्यासाठी काल रात्री बारा वाजेच्या सुमारास सहाजण पिकअप वाहन घेऊन चोरी करण्यासाठी आले होते.
मात्र, या चोरट्यांची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तत्काळ या ठिकाणी जाऊन चोरांना पकडले. मात्र, गावकऱ्यांच्या तावडीतून चार जण पळून गेले. मात्र, दोन चोरट्यांना पकडण्यात गावकऱ्यांना यश आले आहे.
ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती तळोदा पोलिसांना कळवल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले होते. ग्रामस्थांनी दोन चोर व पिकप वाहन पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे याबाबत अधिक तपास तळोदा पोलिस (Taloda Police) करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.