पंकजा मुंडे  - Saam Tv
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली; विशेष बैठक बोलवा : पंकजा मुंडे

भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे गृहमंत्री, पोलिस महानिरीक्षकांना पत्र

विनोद जिरे

बीड - बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून आता भाजप नेत्या पंकजा मुंडे आक्रमक झाल्या आहेत. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली असून पोलिसांचा कसलाही धाक गुन्हेगारांवर (Criminals) राहिला नाही. चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवर अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. या घटनांमुळे सर्व सामान्य नागरिकांत भीती निर्माण झाली असून याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे, त्यासाठी फक्त बीडच्या (Beed) विषयावर विशेष बैठक बोलवावी. अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गृहमंत्री (Home Minister), गृहराज्यमंत्री आणि विशेष पोलिस महानिरीक्षक यांना पत्र पाठवून केली आहे.

त्या पत्राच्या माध्यमातून म्हणाल्या आहेत, की गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्याला कारणही तसेच आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना जिल्ह्यात मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवर अत्याचार, खंडणी वसुली, तलवारी, रिव्हॉल्व्हर अशा घातक शस्त्रास्त्रांचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे. बीड, परळी, अंबेजोगाई, माजलगांव, गेवराई सह सर्वच तालुक्यात गुन्हेगारांनी हैदोस मांडला आहे. पोलिसांचा कसलाही धाक अथवा नियंत्रण राहिले नाही. जिल्हयात पोलिस यंत्रणा आहे की नाही ? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. असे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना, अतिशय चिंताजनक बाब बनली आहेत. अशा घटना गंभीरतेने घेण्याची गरज निर्माण झालीय. केवळ बीडच्या कायदा-सुव्यवस्था विषयावर स्वतंत्र व विशेष बैठक घेऊन, गुन्हेगारांच्या विरोधात कठोर पावले उचलावीत आणि परिस्थिती नियंत्रणात आणून सर्व सामान्य नागरिकांच्या मनातील भिती दूर करावी. अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्राद्वारे केलीय. त्यामुळं आता बीडच्या विषयावर बैठक होणार का? जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना कमी होणार का? याकडं मात्र आता सर्वांचेच लक्ष्य लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या माणगावमध्ये कोसळल्या पावसाच्या सरी

शरद पवार गटाला धक्का; २ बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवार गटाच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार

Shocking : मुंबईत रक्तरंजित थरार! हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर बॉयफ्रेंडनेही आयुष्य संपवलं

EPFO Rule: तुमची कंपनी PF खात्यात कमी रक्कम जमा करतेय का? अशा प्रकारे एका क्लिकवर तपासा संपूर्ण माहिती

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

SCROLL FOR NEXT