Sushil Kedia’s Viral Video Apologizes to Raj Thackeray  
महाराष्ट्र

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Sushil Kedia’s Viral Video Apologizes to Raj Thackeray : मराठीविरोधात गरळ ओकणाऱ्या व्यापारी सुशील केडियाचा माज चांगलाच उतरलाय. केडियानं एक व्हिडिओ पोस्ट करत राज ठाकरेंसह मराठी माणसाची माफी मागितलीय. केडिया नेमकं काय म्हणाला. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी

मराठी भाषेविरोधात गरळ ओकणाऱ्या सुशील केडीयाला अखरे अशा शब्दात माफीनामा मागायला लागलीय. मराठी भाषेचा विजयी मेळावा सुरू व्हायच्या आधीच खळखट्याक झालं.मराठी भाषेवरुन थेट राज ठाकरेंना आव्हान देत मराठीविरोधात गरळ ओकणाऱ्या व्यापारी सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं. आणि केडीयाला आपली चूक समजली.

दरम्यान अपेक्षेप्रमाणेच मराठीच्या विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी मराठीला विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आणि मराठीला विरोध करणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढलाच पाहिजे, असा आदेश दिला.

केडियानं जरी मानसिक तणावातून ट्विट केल्याचं सांगितलं असलं तरी असा मस्तवालपणा नेमका येतो कुठून? महाऱाष्ट्रात राहून मराठीलाच विरोध करायचा, मोर्चे काढायचे, म्हणजे मराठी माणसाच्या सहनशक्तीचा अंत पाहण्यासारखं आहे. पण यापुढे आपल्याच घरात मराठीचे होणारे हाल आता मराठी माणूस कदापी सहन करणार नाहीत. कारण मराठी माणसानं आता मराठीसाठी वज्रमुठ आवळली आहे जी मराठी द्वेष्ट्यांना वेळीच त्यांची जागा दाखवून देईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: 'पदरावर देवी, हातावर मेंहदी...'; रश्मिका मंदान्नाच्या मेहंदी समारंभाचे सुंदर फोटो व्हायरल

Health Care : उन्हाळ्यात दही खाल्याने काय होते? जाणून घ्या

Nashik Tourism : हजारो वर्षांचा इतिहास दडलाय 'या' किल्ल्यात, नाशिकमध्ये घ्या ट्रेकिंगचा अनोखा अनुभव

Blocked arteries: हृदयाच्या धमन्या ब्लॉक झाल्यावर हातामध्ये दिसतात ही लक्षणं; शरीरातील बदल वेळीच ओळखा

Shocking: बंद कारमध्ये आढळले दोघांचे मृतदेह अन् दारू, दार उघडताच पोलिसही चक्रावले; परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT