राज्यातील अनेक जिल्ह्यात लाल परीची सेवा ठप्प; कर्मचाऱ्यांनी पुकारला संप Saam Tv
महाराष्ट्र

राज्यातील अनेक जिल्ह्यात लाल परीची सेवा ठप्प; कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

राज्यातील अनेक जिल्ह्यात लालपरीच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संप पुकारला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात लालपरीच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संप पुकारला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या मागणीकरिता विविध जिल्ह्यात लालपरीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. पुणे, नागपूर, अमरावती, सागली, जालना या जिल्ह्यात आज एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे.

हे देखील पहा-

अमरावती

अमरावती जिल्ह्यात लालपरीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अमरावती मध्यवर्ती बसस्थानक बंद असून, बसस्थानाकातून केवळ मोजक्याच बस सुरू आहेत.

अमरावती बरोबरच जिल्ह्यात बडनेरा, परतवाडा, मोर्शी, आणि वरूड आगार बंद करण्यात आले आहेत. बंद मध्ये १५०० पेक्षा अधिक कामगार सहभागी झाल्याची माहिती मिळली आहे. जिल्ह्यात ३५० बस पैकी केवळ ६० ते ७० बस रस्त्यावर धावत आहेत. ऐन दिवाळीच्या सणात बंद पुकारल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

जालना

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी अंबड मधील लालपरी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.

सांगली

जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद असून, सांगली मिरज मध्ये लालपरी सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागात संपाचा परिणाम दिसून येत आहे.

पुणे

पुणे जिल्हात लालपरीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. नारायणगाव, राजगुरूनगर, इंदापूरमधील डेपो बंद करण्यात आले आहेत. उद्या पुणे शहरातील स्वारगेट ,शिवाजीनगर, भोर ,बारामती बंद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

Shahaji Bapu Patil : डोंगर-झाडीनं माझं नाव झालंय, इज्जत घालवू नका : शहाजीबापू पाटील

SCROLL FOR NEXT