Nashik Bus Fire Saam Tv
महाराष्ट्र

नाशिक सिन्नर रोडवर बर्निंग बसचा थरार; संपूर्ण बस जळून खाक

या खासगी आराम बसने अचानक सिन्नरच्या घाटात पेट घेतला.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक: नाशिक - पुणे महामार्गावर काल रात्रीच्या सुमारासधावत्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. सिन्नरच्या मोहदरी घाटात धावत्या खासगी बसला अचानक आग लागली. ही खाजगी बस नाशिकहून (Nashik) कोल्हापूरला (Kolhapur) निघाली होती. यावेळी या खासगी आराम बसने अचानक सिन्नरच्या घाटात पेट घेतला.

हे देखील पाहा -

या आगीत बस पूणर्पणे जळून खाक झाली आहे. असे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. बसने पेट घेतल्यानं मोहदरी घाटात दोन्ही बाजूंनी वाहतुकीची काही काळ ठप्प झाली होती. 30 ते 35 प्रवासी या बसमध्ये होते हे सर्व प्रवासी सुखरूप आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवून सर्वांना खाली उतरल्याने जीवितहानी टळली. मात्र या घटनेमुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Skin Symptoms: लिव्हरमध्ये बिघाड झालाय कसं ओळखायचं? त्वचेवर दिसणारी ही 5 लक्षणं दुर्लक्षित करू नका; हार्वर्ड तज्ञांचा इशारा

Government Holiday: २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा

Veg kolhapuri Recipe: हॉटेलस्टाईल व्हेज कोल्हापुरी कशी बनवायची?

Maharashtra Live News Update: संजय राऊतांची तोफ पुन्हा धडाडणार, सोमवारी साधणार संवाद

Panipuri Puri Recipe : घरच्या घरी क्रिस्पी पानीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या? वापरा ही सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT