bullock cart race 
महाराष्ट्र

लाखो रुपयांचे बक्षिस जिंकण्यासाठी शेकडाे लाेक जमतात 'या' गावात

ओंकार कदम

सातारा : राज्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी असली तरी देखील सातारा जिल्ह्यातील मायणी परिसरात सध्या बैलगाडा शर्यतींचा अक्षरशः धुरळा उडत आहे. या शर्यतींवर बंदी असून सुद्धा शेकडो लोकांच्या उपस्थितीत या शर्यती पार पडत आहेत. यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असताना प्रशासन मात्र गांधारीच्या भुमिकेत वावरत आहे. (bullock-cart-race-mayani-maharashtra-sml80)

शेकडो लोकांच्या उस्थितीत हाेणा-या या बैलगाडा शर्यतींवर bullock cart race प्रशासनाकडून कोणतीच दखल का घेतली जात नाही असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये पडला आहे.

एकीकडे सामान्य जनता लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळत असताना दुसरीकडे अशा शर्यतींच्या माध्यमातून शेकडो लोक एकत्र येऊन काेविड १९ च्या सर्व मार्गदर्शक तत्वांना तिलांजली देताहेत. प्रशासकीय नियम पायदळी तुडवत आहेत. विशेष म्हणजे मायणी पोलिस प्रशासनापासून अवघ्या चार ते पाच किलाे मीटक अंतरावर पार पडणाऱ्या या शर्यती हाेत असतात.

या शर्यतींत लाखाे रुपयांची उलाढाल हाेते असेही सांगितले जाते. प्रशासनाने मायणी परिसरात हाेणा-या बैलगाडी शर्यतींकडे दुर्लक्ष न करता तातडीने याेग्य ती कार्यवाही करावी अन्यथा काेविड १९ चा भागात प्रादुर्भाव वाढला तर नवल वाटून घेऊ नये असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsAppचं जबरदस्त नवीन फीचर! फोटो दिसणार मोशनमध्ये, वाचा माहिती

Maharashtra Live News Update: कृषी पंप चोरणारे चोरटे पकडले, ५ जण नाशिक पोलिसांच्या ताब्यात

Abhang Tukaram: जेथे जातो तेथे तू माझा सांगाती; तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा लवकरच येणार प्रेक्षकांसमोर

Solapur Crime : इंजिनिअर तरुणाने चोरल्या दुचाकी; सुटे पार्ट करत भंगारमध्ये विकले, ८ दुचाकींसह चोरटा ताब्यात

Agriculture Scheme: शेतात सिंचन व्यवस्था करायचीय? मग तयार करा शेततळं; सरकार देणार अनुदान, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT