WIFE'S DEATH SHOCK LEADS TO ELDERLY FARMER'S SUICIDE IN MEHUNA RAJA VILLAGE Saam tv
महाराष्ट्र

Shocking : हृदयद्रावक! पत्नीच्या निधनाने पतीला बसला धक्का, तेराव्यालाच उचललं टोकाचं पाऊल

Jalgaon News : मेहुना राजा येथे पत्नीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने ७२ वर्षीय शेतकरी तुकाराम महादू कदम यांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. एकाच कुटुंबावर अल्पावधीत दोन दुःखद प्रसंग ओढवल्याने गावात शोककळा पसरली आहे.

Alisha Khedekar

  • मेहुना राजा येथे ७२ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

  • काही दिवसांपूर्वी पत्नीचे निधन

  • पत्नीच्या निधनाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले

संजय जाधव, बुलढाणा

Buldhana Sucide News : बुलढाणाच्या देऊळगावराजा तालुक्यातील मेहुना राजा येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने ७२ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तुकाराम महादू कदम असे मृत वृद्धाचे नाव असून त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम कदम यांच्या पत्नी कचराबाई कदम (Kachrabai Kadam Death) यांचे काही दिवसांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते. अनेक वर्षे एकमेकांच्या सहवासात आयुष्य घालवलेल्या या दाम्पत्यामध्ये अतूट जिव्हाळा होता. पत्नीच्या निधनानंतर तुकाराम कदम यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. तिच्या जाण्याचे दुःख त्यांना असह्य होत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

पत्नीच्या निधनानंतर घरातील वातावरणही अत्यंत दुःखी होते. मात्र, पत्नीच्या विरहातून तुकाराम कदम सावरू शकले नाहीत. पत्नीच्या तेराव्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच, संध्याकाळी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच कुटुंबावर अल्पावधीत दोन दुःखद प्रसंग ओढवल्याने ग्रामस्थांमध्ये शोक व्यक्त करण्यात येत आहे.

तुकाराम कदम (Tukaram Kadam Sucide) हे गावातील शांत, मनमिळावू आणि मेहनती शेतकरी म्हणून परिचित होते. पत्नीच्या निधनानंतर ते पूर्णपणे एकाकी झाल्याचे अनेकांनी सांगितले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीने तोडले शेकडो झाडे

India vs Pakistan : पाकिस्तानची पुन्हा फटफजिती! आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाचा नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार

10 IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; महत्वाच्या शहरातील पोलीस आयुक्त बदलले, कोणाची कुठे नियुक्ती?

Kalyan Traffic Update : कल्याणमध्ये वाहतुकीत मोठा बदल! 'या' मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Vastu Tips: घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय यशाचं रहस्य, लाकडी- दगडाची की धातूची; कोणती असते शुभ?

SCROLL FOR NEXT