Samruddhi Highway Buldhana Bus Accident Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Highway Bus Accident: बेताच्या परिस्थितीत नोकरी मिळवली, जॉईन होण्यासाठी पुण्याला निघाला; पण वाटेतच...

Samruddhi Highway Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास, साम टीव्ही

Samruddhi Highway Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर बसला आग लागल्याने मृतांची ओळख पटवणे कठीण झाले. दरम्यान, या अपघातातील एका तरुण प्रवाशाची ओळख पटली असून तेजस रामदास पोकळे असं या तरुण विद्यार्थ्याचं नाव आहे.

तेजस हा वर्धा (Wardha News) शहरातील कृष्णनगर येथील रहिवाशी होता. त्याने औरंगाबाद येथून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. पहिल्याच प्रयत्नात त्याला पुणे येथे नोकरी लागली होती. शुक्रवारी विदर्भ ट्रॅव्हल्सने तो नोकरीवर जाईन होण्यासाठी निघाला होता.

मात्र, वाटेतच तेजसवर काळाने घाला घातला. समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident)  बस अपघातात त्याचा होरपळून मृत्यू झाला. तेजस पोकळे हा अत्यंत हुशार आणि होतकरू मुलगा होता. रामदास पोकळे हे तेजसचे वडील. रामदास हे हातमजुरी करून फर्निचर तयार करायचे.

घरची परिस्थिती हलकीची असताना रामदास यांनी आपल्या मुलाला चांगल शिक्षण दिलं. तेजस हा लहानपणापासून हुशार असून त्याला दहावी आणि बारावीत गणितात १०० पैकी १०० गुण मिळाले होते. औरंगाबाद येथे अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तेजसला चांगली नोकरी लागली.

आई आणि वडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज करून तेजस हा पुण्याला जाण्यासाठी निघाला. मात्र, समृद्धी महामार्गावरील बुलढाण्याजवळ बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात तेजसला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला वेळेवर बाहेर पडता आले नाही. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : वरळी डोममध्ये राज ठाकरेंची व्हॅनीटी व्हॅन दाखल, पाहा व्हिडिओ

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्यू, वाचून संताप येईल

Sarzameen : "यहां हर फैसला एक कुर्बानी है..."; इब्राहिम अली खानच्या 'सरजमीन'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT