sailani baba darga saam tv
महाराष्ट्र

Buldhana: काेराेनाचा धसका; सैलानी यात्रा सलग तिसऱ्या वर्षी रद्द

यात्रा सुरू ठेवल्यास कोरोनाची बाधा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त केली जात होती.

संजय जाधव

बुलडाणा : हिंदु-मुस्लीमांच्या एकतेचे प्रतिक असलेली बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रा (sailani baba yatra 2022) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव सराई येथे दरवर्षी भरणारी सैलानी बाबांची यात्रा सलग तिसऱ्या वर्षी ही रद्द करण्यात आली आहे. सध्या (buldhana) जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पाहता खबरदारीचा उपाय म्हणून तथा साथरोग प्रतिबंधक कायदा तथा आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत जिल्हाधिकारी एम. रामामूर्ती यांनी या यात्रेस स्थगिती दिली आहे. (sailani baba yatra latest marathi news)

या यात्रेत राज्यासह देशभरातून जवळपास पाच ते सहा लाख भाविक येत असतात. यात्रा सुरू ठेवल्यास कोरोनाची (corona) बाधा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे हा यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितां विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी पोलिस प्रशासनाने (police) दर्गा बंद करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला केली आहे. गेल्या वर्षी यात्रा रद्द झाल्यानंतरही अनेक भाविक सैलानी यात्रेत पोहोचत होते. त्यामुळे पोलिस, महसूल व जिल्हा परिषद प्रशासनाला मोठी कसरत करून भाविकांना आल्या पावली परत पाठवावे लागेल होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डिझेलसाठी 2-4 किमीच्या रांगा; दोन दिवसांपासून पुरवठा ठप्प

SBI Jobs: खुशखबर! स्टेट बँकेत नोकरीची संधी; ८२१ पदांसाठी भरती जाहीर; पगार ₹८०,०००; अर्ज कसा करावा?

Type 2 diabetes: पुरेशी झोप घेऊनही थकवा जात नाही? टाइप 2 डायबिटीजची ही ५ लक्षणं वेळेत ओळखा

Political News : मोठी बातमी! दिल्लीत बड्या नेत्याच्या घरावर ED ची धाड, राजकारणात खळबळ

Lipstick Shades: ग्लॉसी की मॅट? कोणत्या लिपस्टिकने मिळेल ग्लॅमरस आणि परफेक्ट लूक

SCROLL FOR NEXT