Buldhana Political News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेनेते रविकांत तुपकर यांना फौजदारी कलम १४९ अन्वये बुलढाणा पोलिसांच्या वतीने नोटीस देण्यात आली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबई येथील पिकविमा कंपनीचे कार्यालय असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीच्या २० व्या मजल्यावरुन शेतकऱ्यांसह उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा गंभीर इशरा दिला आहे. (Latest Marathi News)
त्यांनंतर प्रशासनाची एकच खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. शहर पोलिसांनी (Police) तुपकरांना प्रत्यक्ष घरी जावून नोटीस बजावली असून आंदोलन करु नये, असे सूचित केले आहे. पण आता माघार नाही, जीव गेला तरी चालेले पण कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणारच अशी भूमिका तुपकरांनी (Ravikant Tupkar) जाहीर केली आहे.
सोयाबीन - कापसाला दरवाढ द्यावी, पीकविमा, अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यात जमा करावे, पीककर्जाचे वाटप पेरणीपूर्वी करावे, पेरणी शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपयांची मदत द्यावी यासह शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करीत आहे. परंतु सरकार दुट्टपी धोरण राबवित आहे.
त्यामुळे १५ जून पर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास १६ जून रोजी हजारो शेतकऱ्यांना घेऊन मुंबईत (Mumbai) धडक देऊ आणि एआयसी या विमाकंपनीच्या मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केट मधील २० व्या मजल्यावर असलेल्या कार्यालयातून उड्या मारु, असा गंभीर इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
त्यांच्या या इशाऱ्याने एकच खळबळ उडाली आहे. बुलढाण्यापासून ते मुंबई पर्यंचे प्रशासन अर्लट झाले आहे. बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकरांना नोटीस बजावली असून आंदोलन करण्यास मज्जाव केला आहे.
शिवाय गुन्हे दाखल करण्याचा इशाराही दिला आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी गुन्हे दाखल होण्याची या आधीही पर्वा केली नाही आणि आताही करणार नाही त्यामुळे आंदोलनावर ठाम असल्याचे तुपकरांनी सांगितले आहे. सरकारला जर आमचे मृतदेहच पहायचे असतील तर आम्ही हसत - हसत २० व्या मजल्यावरुन उड्या मारायला तयार आहोत, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.