buldhana, gutkha, buldhana crime news, madhya pradesh saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : ट्रकचा पाठलाग करुन पाेलिसांनी पकडला पस्तीस लाखांचा गुटखा

या मार्गावर सातत्यानं कारवाई केली जाते. तरी गुटख्याची वाहतुक थांबलेली नाही.

संजय जाधव

Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेश येथून नेहमीच गुटख्याची तस्करी केली जाते. पाेलिसांनी किती प्रयत्न केले तरी त्यात दिवसेंदिवस वाढ हाेत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान पाेलिसांनी नुकताच एक ट्रक पकडून पस्तीस लाख रुपयांच्या गुटख्यासह (gutkha) दाेघांना ताब्यात घेतलं आहे.

ही कारवाई बुलढाणा पोलिसांनी मेहकर जवळ केली. गुटखा वाहतूक करणारा ट्रक येणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे मिळाली हाेती. पाेलिसांनी संबंधित ट्रक येताच त्याचा पाठलाग केला आणि ट्रक पकडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार हा ट्रक मध्यप्रदेश येथून आला हाेता. या कारवाईत पस्तीस लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसेच ट्रक देखील ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चाैकशी सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT