Ravikant Tupkar saam tv
महाराष्ट्र

Ravikant Tupkar News : तुपकरांचा जामीन रद्द करा, पाेलिसांचा कोर्टात अर्ज; रविकांत तुपकर म्हणाले, मी घाबरत नाही, सत्ताधाऱ्यांचा मला जेलमध्ये टाकण्याचा डाव!

Ravikant Tupkar Latest News : पाेलिसांच्या भूमिकेमुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान उद्या (ता.7) न्यायालयात रविकांत तुपकर यांनी हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने बजावले आहेत.

संजय जाधव

Buldhana News :

शेतकरी नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar latest marathi news) यांच्या आंदोलनांमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत हाेते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे त्यांच्यावरील स्थानबद्धतेची कारवाई याेग्य असून त्यांचा जामीन रद्द करुन त्यांची रवानगी तुरुंगात करावी असा अर्ज बुलढाणा पाेलिस दलाने (buldhana police) न्यायालयात दाखल केला आहे. पाेलिसांच्या भूमिकेवर रविकांत तुपकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना आम्ही शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी लढत आहाेत. त्यामुळे वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी तुरुंगात जायची वेळ आली तरी जाऊ असे स्पष्ट केले. (Maharashtra News)

रविकांत तुपकर हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असून शेतकऱ्यांसाठी आक्रमकपणे रस्त्यावर येऊन लढणारा नेता अशी रविकांत तुपकर यांची ओळख आहे. दूसरीकडे बुलढाणा शहर पोलिसांनी रविकांत तुपकरांना सराईत गुन्हेगार ठरवले आहे.

तुपकर यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे जिल्ह्यामध्ये वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांची मागील गुन्ह्यातील जमानत रद्द करून त्यांची तुरुंगात रवानगी करावी अशी मागणी बुलढाणा शहर पोलीसांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली आहे.

पाेलिसांनी त्यांच्या अर्जात रविकांत तुपकर यांचे विरुद्ध आतापर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी केलेल्या आंदोलनाचे २१ निरनिराळे गुन्हे दाखल आहेत. तुपकर यांच्या आंदोलनांमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच जनजीवन विस्कळीत होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आंदाेलनामुळे जनतेस वेठीस धरण्याचे प्रकार होत आहेत. त्यामुळे त्यांचेवर स्थानबद्धतेची कारवाई योग्य असून त्यांची तुरुंगात रवानगी करावी असे पोलिसांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे.

वेळप्रसंगी जेलमध्ये जाईन : रविकांत तुपकर

पाेलिसांच्या भूमिकेमुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी तुरुंगात जायची वेळ आली तरी आपण जायला तयार असल्याचे तुपकर यांनी साम टीव्हीशी बाेलताना स्पष्ट केले.

सत्ताधा-यांची पायाखालची वाळू सरकली

लाेकसभा निवडणुक लढविण्याचा निर्धार केल्यापासून गावागावांत आम्हांला जनाधार मिळू लागला आहे. यामुळे सत्तेतील काही लाेकांची पायाखालची वाऴू सरकली आहे. सत्तेतील लाेकांनी पाेलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझा जामीन रद्द करण्याचा डाव आखला गेला आहे. माझ्यावर दाखल असलेले गुन्हे हे आंदाेलनाचे आहेत. मी उद्या न्यायालयात माझी बाजू मांडेन असेही तुपकरांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT