Buldhana News Today Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: ५ बहिणींना एकुलता एक भाऊ, जेसीबीखाली चिरडून तरुणाचा मृत्यू, अख्खं गाव हळहळलं

Buldhana News Today: वडिलांच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी तरुण सांभाळत होता.

संजय जाधव

Buldhana Marathi News: पिकात पावसाचे पाणी शिरून पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी उमरा देशमुख येथील तरुण शेतकरी अक्षय देशमुख हा आपल्या शेतात जेसीबीच्या साहाय्याने नाली खोदून घेत होता. यावेळी अक्षय केबिन मध्ये चालकाच्या शेजारी बसलेला होता.

अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने जेसीबी पलटी झाली आणि यात अक्षय जेसीबी खाली दबला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत अक्षयला बाहेर काढले आणि ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी अक्षयचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. (Latest Marathi News)

घरातील सर्व जवाबदारी त्याच्यावरचं होती

अक्षय देशमुख याच्याकडे दोन एकर शेती होती. वडिलांच्या निधनानंतर घराची सर्व जबाबदारी तरुण सांभाळत होता. अश्यात पावसाळ्याचे पाणी शेतात शिरून पिकाचे होणारे नुकसान पाहता अक्षयने जेसीबीच्या (JCB) साहाय्याने बांधावर नाली खोदण्याचे काम सुरु केले होते.

मात्र नाली खोदण्याचे काम सुरु असतांना अचानक जेसीबी पलटी झाली, ज्यात अक्षय त्या खाली दबला गेला. याची माहिती परिसरातील नागरिकांना समजल्यावर दुसरा जेसीबी पलटी झालेल्या जेसीबीला काढण्यासाठी बोलावण्यात आलं. त्यानंतर अक्षयला बाहेर कढणून गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले मात्र, वाटेतच मृत्यू झाला. (Buldhana News)

वडिलांच्या निधना नंतर पाच बहिणीची जबाबदारी आणि अर्धांग्युवायू झालेल्या आईची जबाबदारी त्याच्यावर होती. मात्र नशिबाने साथ सोडली. या घटनेने गावात यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. अक्षयचा अचानक मृत्यू झाल्यामुळे गावकऱ्यांना सुध्दा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Constable Death Case: पत्नीनं पोलीस नवऱ्याचा घेतला जीव? पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनं पालघरमध्ये खळबळ

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कृषी योजनांचा लाभ मिळवायचाय? ई-केवायसी अन् फार्मर आयडी आहे गरजेचं

Weather Update: सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणार धुव्वाधार पाऊस; १६ राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

तुमच्या सौंदर्यावर पाकचा क्रिम 'बॉम्ब', आरोग्याला घातक उत्पादनांची महाराष्ट्रात घुसखोरी

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणामागे मोदींचा डाव? डिलिमिटेशनसाठी नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT