Buldhana crime Saam tv
महाराष्ट्र

Buldhana crime : मेहकर येथील सराफा दुकानात चोरी; १३ लाखांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरात सराफ व्यावसायिक कैलास धानुका यांचे मथुरा ज्वेलर्स या दुकानात रात्रीच्या वेळी चोरी झाली आहे.

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर शहरात चोरट्यानी सराफा दुकान फोडले आहे. या दुकानातून चोरट्यानी सुमारे १३ लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने लांबवीले आहेत. दुकानात चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात डाईड झाले आहेत.  

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकर शहरात सराफ व्यावसायिक कैलास धानुका यांचे मथुरा ज्वेलर्स या दुकानात रात्रीच्या वेळी चोरी झाली आहे. चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानात चोरी केली असल्याचे समोर आले आहे. या सराफा दुकानातून चोरट्यांनी १३ लाखांचे दागिने लंपास केले असून चोरट्यांची ही चोरी दुकानातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरामध्ये कैद झाले आहेत. सायंकाळी दुकान मालक कैलास धाणुका यांनी दुकान बंद करून घरी गेले होते. दुकान बंद झाल्यानंतर चोरट्यानी हा डाव साधला आहे. 

दरम्यान आज सकाळीच ओळखीच्या व्यक्तीने सराफ व्यावसायिक धानुका यांना फोन आला की दुकानाचे शटर उघडे आहे. कैलास यांनी दुकानात जाऊन पाहिले असता दुकानात (Theft) चोरी झाल्याचे समजले. यावेळी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे. मात्र या घटनेमुळे सराफा व्यावसायिक मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT