MLA Sanjay Raimulkar News:  Saamtv
महाराष्ट्र

Buldhana News: शिंदें गटातील आमदाराची ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल

MLA Sanjay Raimulkar News: काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकाराला शिवीगाळ केली होती.

Gangappa Pujari

संजय जाधव, प्रतिनिधी...

Buldhana News: काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकाराला शिवीगाळ केली होती. ज्यावरुन जोरदार टीकाही झाली. हे प्रकरण ताजे असतानाच शिवसेना शिंदे गटाचे मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांनी ग्रामपंचायत सदस्याला शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येत्या काही दिवसात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मेहकर तालुक्यातील साब्रा येथील गजानन वानखेडे या ग्रामपंचायत सदस्यान आमदार डॉ.संजय रायमुलकर यांना कार्यक्रमाची पास मागण्यासाठी फोन केला होता.

मात्र अनेकदा फोन केल्याने शिंदे गटाचे मेहकरचे आमदार संजय रायमुलकर हे चिडले आणि त्यांनी थेट या ग्रामपंचायत सदस्याला अश्लील शिवीगाळ केल्याचा एक कॉल रेकॉर्ड सध्या जिल्हाभरात व्हायरल होत आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडली आहे.

या प्रकरणावर आमदार संजय रायामुलकर काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागले आहे. यापूर्वी सुद्धा आमदार रायमुलकर यांचे काही लोकांना शिवीगाळ केल्याचे ऑडियो व्हिडीओ व्हायरल झालेलं होते. तसेच 4, 5 दिवसापूर्वी शिंदे गटाचे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी एका पत्रकाराला सुद्धा शिवीगाळ केली होती. त्यामुळे शिंदेगटातील आमदारांची दादागिरी सुरूच असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT