Water Crisis Saam tv
महाराष्ट्र

Water Crisis : १५ वर्षांपासून भिषण पाणी टंचाईचा सामना; दूरवरून आणावे लागते पाणी, शिंदी गावातील दोन योजना अपूर्णच

Buldhana News : शासनाने शिंदिं गावांसाठी दोन पाणी योजना मंजूर केल्या होत्या. तरी देखील गावातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटलेला नाही. आजही मैलो दूर जाऊन महिलांना डोक्यावर पाणी आणावे लागत आहे

संजय जाधव

बुलढाणा : पाणी टंचाईची भीषणता सर्वदूर जाणवू लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यात भिषण पाणी टंचाई जाणवत आहे. यात जिल्ह्यातील शिंदी गावात भीषण वास्तव समोर येत असून या गावात गेल्या पंधरा वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात पाच वर्षांपूर्वी पाणी योजना आणल्या. मात्र योजने काम पूर्ण न करताच ठेकेदार बिल घेऊन गायब झाला आहे. यामुळे योजनांचे काम अपूर्णच राहिले आहे.  

बुलढाणा जिल्ह्यातील ८३५ गावात पाणी टंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. काही ठिकाणी टँकर तर काही ठिकाणी खाजगी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. तर सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी गावात कायम पाणी टंचाई आहे. शासनाने शिंदिं गावांसाठी दोन पाणी योजना मंजूर केल्या होत्या. तरी देखील गावातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटलेला नाही. आजही मैलो दूर जाऊन महिलांना डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. 

दोन्ही योजना अपूर्णच 

गावासाठी राष्ट्रीय पेयजल योजना मागील पाच वर्षा अगोदर मंजूर केली. ठेकेदाराने रताळी येथील धरणात विहीर बांधली, गावाजवळ टाकी बांधली. मात्र पाईप लाईन टाकली नाही. पावणे दोन कोटी रुपयाचे बिल काढून् पळून गेला आहे. तर दुसरी जल जीवन मिशन योजना मंजूर फक्त पाण्याची अर्धवट टाकी ४८ लाख रुपयाची बांधली. यात देखील ठेकेदार बिल काढून पळून गेला आहे. दरम्यान सिंदखेडराजा मतदार संघात सहा वेळा आमदार, तीन वेळा कॅबिनेट मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे राहिले. मात्र मतदार संघातील साधी पिण्याच्या पाण्याची सोय करू न शकल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.

भर उन्हात पाण्यासाठी भटकंती 
शासनाने कोट्यावधी रुपये खर्च केले. मात्र पाण्याचा एक थेंब सुद्धा गावात आला नाही. महिला दिवसभर पाण्यासाठी ४१ डिग्रीच्या कडक उन्हात पाण्यासाठी वनवन भटकताना दिसतात. एका १०० फुट खोल विहीरितून पाणी काढण्यासाठी जीव धोक्यात घालून पाणी काढून तहान भागवत आहेत. मैलोदूर पाण्यासाठी जाव लागत आहे. हे भिषण वास्तव जिल्हा प्रशासनाला दिसत नसल्याने पाणी भरणे हेच नशिबात असल्याचा आरोप महिला करीत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT