Swine Flu Saam tv
महाराष्ट्र

Swine Flu: धोक्याची घंटा..स्वाईन फ्लूचा दुसरा रुग्ण आढळला

धोक्याची घंटा..स्वाईन फ्लूचा दुसरा रुग्ण आढळला

संजय जाधव

बुलडाणा : जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा धोका वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरात एक 28 वर्षीय तरुणी स्वाईन फ्लूने ग्रस्त मिळून आढळून आली आहे. सदर तरुणी (Health) आरोग्य विभागाशी संबंधीत आहे. (Buldhana News Swine Flu)

बुलडाणा (Buldhana) शहरात मागील आठवड्यात येथील इकबाल चौकातील एक युवक स्वाईन फ्लूचा बळी ठरला आहे. या अनुषंगाने आतापर्यंत 14 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यात दोन जण स्वाईन फ्लू ग्रस्त आढळले आहेत. स्वाईन फ्लू संसर्गाचे प्रमाण 14 टक्के आहे. सदर तरुणीची स्वाईन फ्लू तपासणी जिल्हा महिला रुग्णालयातील कोविड लॅबमध्ये करण्यात आली.

प्रकृती धोक्‍याबाहेर

स्‍वाईन फ्लू ग्रस्‍त तरुणीवर आता शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर असल्‍याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाने स्वाईन फ्लूचा धोका लक्षात घेऊन सर्वेक्षण आणि चाचण्या वाढवायला हव्या, अशी मागणी नागरिक करित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: २०२९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच लढली जाईल

Pune : पुणे हादरलं! तरुणाने रिक्षात गळफास घेत आयुष्य संपवलं; धक्कादायक कारण समोर

Bone Health: हाडं ठिसूळ किंवा कमकवूत झाली की शरीरात हे 5 मोठे बदल दिसून येतात

Gold Price Today : आज चांदी स्वस्त! सोन्याचे दर वाढले की घसरले? सुवर्णनगरीतील ताजे भाव जाणून घ्या

Shocking : भयंकर! बायको-पोरांसह ६ जणांची हत्या, आरोपीनं अख्ख्या कुटुंबाला संपवलं, धक्कादायक कारण आले समोर

SCROLL FOR NEXT