Samruddhi Mahamarg Luxury Bus Accident News Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Bus Accident: समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात; २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Samruddhi Mahamarg Luxury Bus Accident News: चालकाला झोप लागल्याने बस थेट डिव्हायरला धडकली. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे.

Satish Daud

संजय जाधव, साम टीव्ही

Samruddhi Mahamarg Luxury Bus Accident News: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) विदर्भ ट्रॅव्हल्स खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बस थेट डिव्हायरला धडकली. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे.

सिंदखेडराजा (Buldhana Accident News) परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. बसमधील जखमींना तातडीने उपचारासाठी बुलढाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करीत होते. बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायरला धडकली आणि रस्त्यावरच उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, क्षणार्धात बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला.

या भीषण अपघातात (Accident News) बसमधील २५ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर काही प्रवासी जखमी आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. दररोज किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहे. परिवहन विभागाकडून अपघात रोखण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्यापही अपघातांचे प्रमाण कमी झाले नाही.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT