Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : शेतकऱ्याची संमती न घेता खोदला शेतातून रस्ता; ग्रामपंचायतचा अजब कारभार

Buldhana News : टाकळी खाती येथे नव्याने निर्माण होणारा रस्ता हा आवश्यक नसताना फक्त ग्रामपंचायत सदस्य यांनी काबीज केलेल्या गावरान जमिनीकडे त्यांना जाण्याकरिता केले जात आहे

संजय जाधव

बुलढाणा : जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव ग्रामपंचायत हद्दीतील टाकळी खाती येथील (Farmer) शेतकरी अशोक दांडगे यांचे गावानजीक बागायती शेती आहे. यांच्या खाजगी मालकीच्या शेतातून ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांना कोणत्या प्रकारची नोटीस न देता किंवा त्यांची संमती न घेता आवश्यक (Buldhana) नसणारा रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. (Latest Marathi News)

जळगाव (Jalgaon) जामोद तालुक्यातील आसलगाव ग्रामपंचायत हद्दीत अनेक प्रभागात रस्ता व नाल्याची सुविधा नाही. मात्र टाकळी खाती येथे नव्याने निर्माण होणारा रस्ता हा आवश्यक नसताना फक्त ग्रामपंचायत (Gram Panchayat) सदस्य यांनी काबीज केलेल्या गावरान जमिनीकडे त्यांना जाण्याकरिता केले जात आहे. याच उद्देशाने सदर रस्त्याचे कामकाज सुरू केले असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याने केला आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा शेतकऱ्याचे याबाबत माहिती देण्यात आली नाही. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर उपोषण करणार 
रस्ता खोदकाम केल्याने शेतकऱ्याचे झालेले नुकसान ग्रामपंचायत प्रशासनाने त्यांना त्वरित द्यावे; तसेच पुढील काम थांबवण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. योग्य न्याय न मिळाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्याने दिला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ३ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व वकिलांचे १ दिवस कामकाज राहणार बंद

SSC-HSC Exam Date : दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर; वाचा कोणता पेपर कधी? जाणून घ्या

बोईसरमध्ये दिवसाढवळ्या दरोड्याचा प्रयत्न; ज्वेलर्सवर गोळीबार, पाहा व्हिडिओ

Dark Underarms Home Remedies: डार्क अंडरआर्म्समुळे हात वर करायला लाज वाटते? या ७ टिप्स करतील तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह

मोठी बातमी! अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी २,५४० कोटी ९० लाख ७९ हजार निधी

SCROLL FOR NEXT