Ravikant Tupkar Rally Saam TV
महाराष्ट्र

Ravikant Tupkar Rally : वाजत, गाजत, नाचत...उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रविकांत तुपकरांची मिरवणूक

Ravikant Tupkar Buldana : रविकांत तुपकर यांचा आज बुलढाण्यात निर्धार मेळावा सुरू होता. सभास्थळी पोहचल्यावर तुपकरांनी उपस्थितांशी संवाद साधला. या निर्धार मेळाव्याला शेतकरी आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

Ruchika Jadhav

Buldana :

शेतकरी नेते रविकांत तुपकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ते अर्ज दाखल करत आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी तुपकारांनी ढोल-ताशाच्या तालावर ठेका धरलाय. तसेच वाजत-गाजत त्यांची मिरवणूक देखील काढण्यात आली आहे.

रविकांत तुपकर हे आपला नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालाकडे निघाले आहेत. येथे जाण्याआधी त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर डफल्यांचा नाद धुमू लागला. तसेच रविकांत तुपकरांची मिरवणूक काढण्यात आली. या आनंदात कार्यकत्यांसह रविकांत तुपकर देखील थिरकले आहेत.

रविकांत तुपकर यांचा आज बुलढाण्यात निर्धार मेळावा सुरू होता. सभास्थळी पोहचल्यावर तुपकरांनी उपस्थितांशी संवाद साधला. या निर्धार मेळाव्याला शेतकरी आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मेळाव्यात भाषण तसेच डफलीच्या तालावर आनंद व्यक्त केल्यानंतर तुपकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बैलगाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेत.

मी अपक्ष नाही तर वंचित , बहुजन, भूमिहीन, शेतकरी यांचा उमेदवार आहे. आज मी अर्ज दाखल करणार आहे यासाठी जिल्हाभरातून हजारो शेतकरी बांधव स्वयंफूर्तीने उपस्थित राहणार आहेत, असं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलंय.

विरोधकांवर निशाणा साधत त्यांनी पुढे म्हटलं, फक्त पैशाच्या भरवशावर निवडणुका जिंकता येत नाहीत. भानगड अशी झाली की, माझ्या उमेदवारीमुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता ही निवडणूक जनतेची आहे आणी जनता माझाच विचार करणार असून माझा विजय निश्चित आहे, असा विश्वास रविकांत तुपकर यांनी व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT