Buldhana News
Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News: चार गावांची मध्यप्रदेशमध्ये जाण्याची तयारी; मूलभूत सुविधांपासून वंचित गावातील ग्रामस्थांनी घेतला निर्णय

संजय जाधव

बुलढाणा : जिल्ह्याच्या सीमेवर असलेले आदिवासी भागातील जळगाव जामोद तालुक्यातील चार गावांना गेल्या 75 वर्षात कुठल्याही मूलभूत सुविधा मिळाली नाही. यामुळे आता वैतागून चार गावातील ग्रामस्थांनी आमच्या गावांचा मध्यप्रदेशमध्ये (Madhya Pradesh) समावेश करण्याची मागणी बुलढाणा (Buldhana) जिल्हाधिकार्यांना एका निवेदनाद्वारे केल्याने जिल्हतात एकच खळबळ उडाली आहे. (Letest Marathi News)

अगोदरच कर्नाटक सिमावाद, तर गुजरातमध्ये (Gujrat) काही गावे सामील होण्याच्या मार्गावर आहेत. त्यात आज बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील भिंगारा, गोमाल 1, गोमाल 2 व चालीस टपरी अश्या चार आदिवासी वास्तव्यास असलेल्या गावातील ग्रामस्थानी मध्यप्रदेशमध्ये सामील करण्याची मागणी राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नागरीकांच्‍या मागणीकडे दुर्लक्ष

जळगाव जामोद या तालुक्यातील काही आदिवासीयांच्‍या गावात स्वातंत्र्यानंतर अद्यापपर्यंत कुठलीच मूलभूत सुविधा मिळाली नाही. विज, शिक्षण, आरोग्य व रस्ते या लोकांना कधीच मिळाले नाही. यासाठी आदिवासी नागरिकांनी बरेच आंदोलने केली. परंतु, अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही. असंख्य निवेदन देवून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या ही मागणी सातत्याने करण्यात आली. मात्र प्रशासनाला किंवा शासनाला जाग आलीच नाही. म्हणून अश्या जिल्ह्यात व राज्यात कसे राहायचे असा विचार आदिवासी बांधवांच्या मनात आला. म्हणून शेवटी कंटाळून जिल्हाधिकार्याना निवेदन देत आमच्या चार गावांना मध्यप्रदेश या राज्यात सामील करा असे पत्रच देण्यात आले आहे.

अन्‌ प्रशासन झाले जागे

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील चाळीसटपरी , भिंगारा, गोमाल १ आणि गोमाल २ या चार गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे सांगत त्यांनी मध्यप्रदेशात जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तशा आशयाचे निवेदन सुद्धा उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत, या गावांमध्ये शासनाच्या सुविधा पोहोचवल्या आहेत. पुन्हा आता या गावाला भेट देऊन नागरिकांच्या समस्येचे निराकरण करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda Maval Lok Sabha News | गोविंदा नेमकं कोणासाठी आला हेच विसरला अन् बुचकळ्यात पडला

ICSE Bord Result: आयसीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

Today's Marathi News Live : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकरांचा नवा जाहीरनामा

D.K. Shivkumar: कार्यकर्त्याने खांद्यावर हात ठेवला.. उपमुख्यमंत्र्यांनी थेट कानाखाली लगावली; काँग्रेस नेत्याचा VIDEO व्हायरल

Today's Gold Silver Rate : लग्नासाठी दागिने बनवायचेत? मग आजचा सोने-चांदीचा भाव जाणून घ्या

SCROLL FOR NEXT