Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : नदीवर पूल नसल्याने अंत्यविधीसाठी पाण्यातून मार्ग; ट्रॅक्टरमधून न्यावी लागली अंत्ययात्रा

संजय जाधव

बुलढाणा : आजही अनेक गावांमध्ये चांगले रस्ते किंवा पूल नसल्याने नदीतून मार्गक्रमण करावे लागते. दरम्यान अनेकदा नदीवर पूल नसल्याने प्रेतयात्रा नेताना ग्रामस्थांना नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो. असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील हिंगणा काझी या गावात समोर आला असून ट्रॅक्टर मधून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. 

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील हिंगणा काझी या गावातील नदीवर पूल अजूनही पूल नाही. पावसाळ्यात नेहमीच गावकऱ्यांना या अडचणींचा सामना करावा लागतोय, त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून नदीवर पूल बांधण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे, परंतु अजूनही या नदीवर पूल बांधण्यात आला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

ट्रॅक्टरमधून नेली प्रेतयात्रा 

नदीवर पूल नसल्याने गावातील व्यक्तीचा मृत्यू (Death) झाल्यास त्यांना स्मशानभूमीत नेण्यासाठी नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. असाच प्रसंग पुन्हा एकदा उद्भवला असून काल गावातील एका महिलेचा मृत्यू झाला. या महिलेचे पार्थिव अंत्यविधीसाठी स्मशानभूमीकडे नेण्यासाठी नागरिकांना ट्रॅक्टरमधून जनाजा न्यावा लागला. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT