Buldhana Shegaon News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana : नख गळती प्रकरण; केंद्राचे पथक दौरा करून रवाना, केंद्र व राज्य सरकारला देणार अहवाल

Buldhana Shegaon News : शेगाव तालुक्यातील जवळपास १५ गावांमध्ये नागरिकांची केस गळती होऊन टक्कल पडल्याचा प्रकार ३ महिन्यांपासून सुरू आहे. केस गळतीचे प्रकरण सुरु असतानाच नखं गळतीचा धक्कादायक प्रकार समोर

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील गावात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना केस गळती यानंतर नख गळतीचा त्रास सुरू झाला होता. ही बातमी साम् टीव्हीने दाखवल्यानंतर केंद्र सरकारने या भागाचा दौरा करण्यासाठी आकस्मित चिकित्सा राहत पथक स्थापन करून या भागाचा दौरा करण्याचे आदेश दिले होते. यानुसार पथकाने तीन दिवस शेगाव तालुक्यातील अनेक गावांचा दौरा करत रवाना झाले आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळपास १५ गावांमध्ये नागरिकांची केस गळती होऊन टक्कल पडल्याचा प्रकार ३ महिन्यांपासून सुरू आहे. केस गळतीचे प्रकरण सुरु असतानाच या भागात नखं गळतीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा या सर्व गावांमध्ये खळबळ उडाली आहे. आधी टक्कल व्हायरसने नागरिकांची चिंता वाढवली होती पण आता बोटांची नखं जायला लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

केस गळतीचे कारण समोर येईना 
दरम्यान शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरण ताजे असतानाच आता बोंडगावमध्ये केस गळतीनंतर नागरिकांच्या बोटांची नखं ही चालली आहेत. यामुळे या गावातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन महिने झाले तरी देखील केस गळतीसंदर्भात आयसीएमआरचा अहवाल आला नाही. यामुळे केस गळती नेमकी कोणत्या कारणाने होत आहे. याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

केंद्रीय पथक देणार अहवाल 

शेगाव तालुक्यात केस गळती व नख गळती होत असलेल्या रुग्णांची पाहणी केली व त्यांच्याशी संवाद साधला. दरम्यान आज हे पथक परिसरातून दिल्लीसाठी रवाना झाला आहे. हे तात्पुरत्या स्वरूपातील केस गळती व नख गळती असून गंभीर असं काहीही नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. अस आवाहन केलं. याबाबत लवकरच आम्ही केंद्र व राज्य सरकारला अहवाल देऊ अस पथक म्हणाले. यामुळे यात काय समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महामार्गावर अपघाताचा थरार! दुचाकी आणि प्रवाशांनी भरलेल्या बसची समोरासमोर धडक; तरुणाचा होरपळून मृत्यू

Maharashtra Live News Update: संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; पळशी झाशी शिवारातील मका पिकाचे मोठे नुकसान

महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या होत्या; जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याने नवा वाद

Petrol Pump Fraud Tips: कार आणि बाईकमध्ये पेट्रोल भरताना 5 गोष्टी लक्षात ठेवा, तुमची फसवणूक होणार नाही

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा पत्रिका पावसात भिजल्या; विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात|VIDEO

SCROLL FOR NEXT