MP Prataprao Jadhav News : "बाप तो बाप रहेगा" गाण्यावर खासदार प्रतापराव जाधव (mp prataprao jadhav) यांनी ठेका धरला आणि दंडही थोपटले. निमित्त हाेते खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत १७ जागेवर विजय मिळवल्यानंतरच्या मिरवणुकीचा. खासदार जाधव यांचा नाचतानाचा व्हिडिओ समाज माध्यमात (Social Media) व्हायरल (vial) हाेऊ लागला आहे. (Maharashtra News)
धीरगंभीर तसेच संयमी राहणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्या शिवसेनाचे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ‘बाप तो बाप रहेगा" या गाण्यावर चांगलाच ठेका धरला अन दंडही थोपटले. हा ठेका त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे धरला. त्यांनी थाेपटलेले दंड त्यांना मेहकर मतदारसंघात घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना दाखविण्यासाठी तर नाही ना, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघासह सहकार क्षेत्रातही खासदार जाधव यांचे मागील ३५ वर्षांपासून वर्चस्व कायम राहिले आहे. मेहकर, लोणार बाजार समित्याच्या निवडणुकीत जाधव यांना मात देण्यासाठी महाविकास आघाडीने रणनिती आखली, पण जमले नाही.
आता मेहकर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने (mva) प्रयत्न करून पाहिला. मात्र १७ पैकी १७ जागा जिंकून खासदारांच्या नेतृत्वाखालील भूमिपुत्र पॅनेलने एकतर्फी विजय मिळवीत आघाडीला चांगलीच धूळ चारली.
या निकालानंतर कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी खासदारांनी सुद्धा बाप तो बाप रेहेगा या गाण्यावर ठेका धरला. यात आमदार संजय रायमूलकर यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. विरोधकांना गाण्यातून आणि नृत्य करताना दंड थाेपाटून संदेश देणाऱ्या खासदार जाधव यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.