Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : फूस लावून पळवून नेलेल्या मुलीची पश्चिम बंगालमधून सुटका; आरोपीलाही घेतले ताब्यात

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्यास असलेली एक मुलगी आपल्या नातेवाइकांसोबत भंडाऱ्याच्या कार्यक्रमात गेली होती.

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली पोलीस स्टेशन हद्दीतून एक १२ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. चिखली पोलिसात याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला होता. दरम्यान मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मुलीला पळवून नेत पश्चिम बंगालमध्ये असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी मुलीची सुटका करत संशयिताला ताब्यात घेतले आहे.  

बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्याच्या चिखली पोलीस स्टेशन हद्दीत वास्तव्यास असलेली एक मुलगी आपल्या नातेवाइकांसोबत भंडाऱ्याच्या कार्यक्रमात गेली होती. मात्र याठिकाणाहून ती बेपत्ता झाली होती. नातेवाईकांनी शोध घेऊनही ती सापडली नसल्याने नातेवाइकांनी चिखली पोलिसांत तक्रार दिली. त्यात एका व्यक्तीवर संशयही व्यक्त केला होता. यामुळे शहरात तणावाची शक्यता निर्माण झाल्याने (Police) पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुलीच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली.  

पोलिसांना गोपनीय व तांत्रिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी व पीडिता ही पश्चिम बंगालमध्ये असल्याचे समोर आले.  दरम्यान पोलीस पथकाने पश्चिम बंगालमध्ये तीन दिवस शोध मोहीम राबवून आरोपी मुन्ना शहा मुबारक शहा याच्या ताब्यातून पीडितेची सुटका केली. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता आरोपीला न्यायालयाने ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early Cancer Detection: कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं कोणती असू शकतात? वेळेवरील निदानाने वाचेल तुमचा जीव

Do Deewane Shaher Mein OTT : मृणाल-सिद्धांतचा रोमँटिक ड्रामा 'दो दीवाने सहर में' ओटीटीवर कधी येणार? वाचा मोठे अपडेट

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार! उभ्या ट्रकला दुचाकीची धडक, एकाचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

SCROLL FOR NEXT