Khamgaon Accident Saam tv
महाराष्ट्र

Khamgaon Accident : खामगावजवळ दोन वेगवेगळे अपघात; तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

Buldhana News : ट्रकमध्ये इंजिनचा आवाज यायला लागल्याने चालकाने ट्रक उभा करत कुठून आवाज येत आहे हे तपासत होता. याच वेळी मागील बाजूने एक ट्रेलर वेगाने येऊन उभ्या ट्रकला धडकला.

संजय जाधव

बुलढाणा : रस्त्याच्या बाजूला ट्रक उभी केल्यानंतर इंजिन तपासणी करत असताना मागून आलेल्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर खामगाव- नांदुरा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. 

बुलढाण्याच्या खामगावजवळ दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये पहिल्या अपघातात एका चालत्या ट्रकमध्ये इंजिनचा आवाज यायला लागल्याने चालकाने ट्रक उभा करत कुठून आवाज येत आहे हे तपासत होता. याच वेळी मागील बाजूने एक ट्रेलर वेगाने येऊन उभ्या ट्रकला धडकला. या अपघातात ट्रेलरमधील चालक व क्लिनर दोघेजण जागीच ठार झाले आहेत. अपघाताची खामगाव पोलिसाना माहिती मिळताच घटनास्थळावर येऊन मृतकांना बाहेर काढले आहे.

अज्ञात वाहनाची धडक 

जिल्ह्यातील खामगाव- नांदुरा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. खामगाव शहरातील टाटा कॅपिटल कंपनीमध्ये काम करणारे दोन कर्मचारी नांदुरा येथे कंपनीच्या कामानिमित्त गेले होते. परत खामगावकडे येत असताना चिखली आमसरी फाट्याजवळ विरुद्ध दिशेने गाडी टाकली असता समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडक दिली.  

एकाचा जागीच मृत्यू 

या अपघातात खामगाव येथील मुकेश शर्मा (वय २७) व सुरज गादगे (वय २५) यांचा मृत्यू झाला. धडक इतकी जोरदार होती की मुकेश शर्मा हा युवक जागीच ठार झाला असून त्याच्यासोबत असलेला सुरज घादगे गंभीररित्या जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनची टीम ही घटनास्थळी पोहोचली व त्यांनी तात्काळ दोघांनाही खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आणले. यामध्ये सुरज गादगे याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ खामगाव येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र सदर युवकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: सुनील ग्रोव्हरनंतर कपिल शर्माचं किकू शारदासोबत बिनसलं? १३ वर्षांनंतर कॉमेडियनने सोडणार 'द कपिल शर्मा शो'; म्हणाला...

Cyber Crime : पहलगाम हल्ल्यात बँकेतून व्यवहार, डिजिटल वॉरंट दाखवत धमकी; वृद्धाला १९ लाखाचा गंडा

PM Ujjawala Yojana: महिलांसाठी आनंदाची बातमी! उज्जवला योजनेत मोफत गॅस सिलिंडरसोबत मिळणार ₹१८३०

Hingoli Crime News: रात्रीच्या वेळी झोपेतून उठवून ऑफिसमध्ये नेलं अन्...; आश्रम शाळेत 11 वर्षाच्या चिमुरडीसोबत अश्लील कृत्य

पुतण्यासोबत संबंध, नंतर जत्रेला नेत नवऱ्याचा काटा काढला, ८ वर्षांच्या मुलाकडून आईचा खरा चेहरा समोर

SCROLL FOR NEXT