Buldhana crime News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana crime News : धक्कादायक..खासगी शिकवणी वर्गात विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; शिक्षक पोलिसांच्या ताब्यात

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंग्लिश स्पिकिंग शिकण्यासाठी मुलीने खासगी क्लास लावला होता.

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील ए टू झेड इंग्लिश स्पिकिंग अकॅडमी चालविणाऱ्या शिक्षकाने एका सतरा वर्षीय विद्यार्थिनीवर लैगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना समोर आल्यानंतर खासगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करत त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंग्लिश स्पिकिंग शिकण्यासाठी मुलीने खासगी क्लास लावला होता. या क्लासमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकाने सदर मुलीला तुला काहीही प्रॉब्लेम आल्यास मी आहे, काळजी करू नको..! असं म्हणत लैंगिक अत्याचार केला. गेल्या अनेक दिवसापासून हा शिक्षक या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करत असल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थिनीने ही बाब आपल्या मैत्रिणींना सांगितली. (Crime News) यानंतर मैत्रिणींनी पीडित मुलीच्या पालकांना सांगितले.  त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

संशयितास घेतले ताब्यात 

पालकांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. यानंतर जळगाव जामोद पोलिसांनी संशयित आरोपी शिक्षक किशोर पाटील यांच्या विरुद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे बदलापूर घटनेनंतर सरकारने सर्व शैक्षणिक संस्थांना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास बंधनकारक केलं होतं , मात्र या इंग्लिश स्पिकिंग अकॅडमी व परिसरात कुठेही सीसीटीव्ही नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT