Mahavitaran  Saam tv
महाराष्ट्र

Mahavitaran Bill : शासकीय कार्यालयांकडे १ कोटी ६७ लाखांचे वीजबिल थकीत; महावितरणकडून नोटीस

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात एकूण सर्व प्रकारचे ५ लाख ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ११८ कोटी रुपये चालू थकबाकी आहे. तर १५२४ शासकीय कार्यालयांकडे १ कोटी ६७ लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे

संजय जाधव

बुलढाणा : सध्या थकीत बिल व कर वसुली जोरात करण्यात आली आहे. महावितरणने देखील थकीत बिलांची रक्कम वसुली करण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय कार्यलयांकडे असलेल्या थकीत बिलांची रक्कम देखील दीड कोटी रुपयांच्या वर पोहचली असून हि वसुली करण्यासाठी महावितरण ऍक्शन मोडमध्ये आले असून शासकीय कार्यालयांना बिल भरण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. 

आर्थिक वर्ष संपत आल्याने थकीत वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण विभाग ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे विज बिल वसुलीसाठी मोहीम राबवण्यात येत आहे. ज्यामध्ये विहित मुदतीत विज बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान शासकीय कार्यालयांकडून देखील मोठ्या प्रमाणात वीज बिलाचा भरणा करण्यास विलंब करण्यात येत असल्याने थकीत बिलांची रक्कम वाढत चालली आहे. 

पाणीपुरवठा, आरोग्य विभागाकडे सर्वाधिक थकीत 
बुलढाणा जिल्ह्यात एकूण सर्व प्रकारचे ५ लाख ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ११८ कोटी रुपये चालू थकबाकी आहे. तर १५२४ शासकीय कार्यालयांकडे १ कोटी ६७ लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. ज्यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाकडे सर्वाधिक वीजबिल थकबाकी असल्याची माहिती महावितरण कडून देण्यात आली आहे. सोबतच तात्काळ थकीत वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मोहीम तीव्र 

बुलढाणा जिल्ह्यात चालू बिलांची थकीत रक्कम हि ११८ कोटी रुपयांवर आहे. यातील शासकीय कार्यालयांची एकूण थकबाकी हि १ कोटी ६७ लाख रुपये आहे. तर मागील जुन्या थकबाकीची रक्कम हि ९०० ते एक हजार कोटीच्या घरात पोहचली आहे. यामुळे मार्च एंडिंगपर्यंत हि थकीत बिलांची वसुली करण्यासाठी महावितरणने मोहीम तीव्र केली आहे. बड्या थकबाकीदारांवर नजर असून मुदतीत रक्कम न भरल्यास वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचा इशारा महावितरणने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

SCROLL FOR NEXT