Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : नकली सोन्याची विक्री करून फसवणूक; राजस्थानमधील दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Buldhana News : बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये पोलीस कर्मचारी रात्री पेट्रोलिंग करत असताना एटीएम समोर दोन व्यक्ती संशयित रित्या उभे असल्याचे आढळून आले.

संजय जाधव

बुलढाणा : गावांमध्ये जाऊन नकली सोन्याचे गाडीने विक्री करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना खामगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून साधारण पाच रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत केला आहे. या दोघांची अधिक चौकशी सुरु असून आणखी काही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे. 

बुलढाण्याच्या (Buldhana News) खामगाव शहरामध्ये पोलीस कर्मचारी रात्री पेट्रोलिंग करत असताना एटीएम समोर दोन व्यक्ती संशयित रित्या उभे असल्याचे आढळून आले. यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी करत त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे नकली सोन्याची काही दागिने आढळून आले. यानंतर (Police) पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता काही गुन्ह्याची कबुली दिली आहे.  

गुजरात, राजस्थानमध्ये गुन्हे दाखल 

दरम्यान हे दोन्ही आरोपी राजस्थानमधील असून त्यांच्यावर गुजरात, राजस्थान राज्यामध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. तर हे सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी त्यांच्याकडून नकली सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, विविध बँकेचे एटीएम कार्ड असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत त्यांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT