Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana : जनावरांच्या गोठ्यास भिषण आग; शेतकऱ्याचे साडेपाच रुपयांचे नुकसान

Buldhana News : शेतामध्येच त्यांचा गोठा असून या गोठ्यात जनावरे बांधलेली असतात. दरम्यान मध्यरात्री गोठ्यास अचानक आग लागली. आग विझविण्यासाठी तात्काळ मदत न मिळाल्याने गोठा पूर्णपणे जाळून खाक झाला

संजय जाधव

बुलढाणा : धाड येथुन जवळच असलेल्या ढालसावंगी येथे एका शेतकऱ्याच्या शेतामधील जनावरांच्या गोठ्याला भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत गाय, बैल व कोंबड्यासह शेती साहित्य जळुन खाक झाले आहे. यात शेतकऱ्याचे सुमारे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील ढालसावंगी येथील शेतकरी शिवाजी तुळशीराम खारडे यांचे पाच लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान झाले. हि घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. ढालसावंगी येथील शेतकरी शिवाजी तुळशीराम खारडे यांची ढालसांगवी शिवारमध्ये गट नं २७ मध्ये शेती आहे. शेतामध्येच त्यांचा गोठा असून या गोठ्यात जनावरे बांधलेली असतात. दरम्यान मध्यरात्री गोठ्यास अचानक आग लागली. आग विझविण्यासाठी तात्काळ मदत न मिळाल्याने गोठा पूर्णपणे जाळून खाक झाला. 

पशुधनासह शेतीचे अवजारे जळाले   

शिवाय गोठ्यात बांधलेले एक बैल, एक गीर गाय, गोऱ्हा तसेच शंभर कोबंड्या यांचा आगीमध्ये मृत्यू झाला आहे. यासोबतच फवारणी पंप स्प्रीकंलर संच, दोन मीनी स्प्रीकंलर ठिबक संच, चार्चींग पंप, पेरणी यंत्र, टिनपत्रे व ईतर शेती अवजारे जळुन खाक झाले आहेत. असे साधारण शेतकऱ्याचे पाच लाख ४९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी कानडजे यांनी पंचनामा केला असुन शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. 

कारखान्याच्या आगीत १२ लाखांचे नुकसान
सोलापूरच्या बार्शी शहरातील साईराणानगर परिसरात स्क्रॅप व्यवसायिक अमर राम गजघाटे यांच्या कारखान्याला भीषण आग लागली. प्राथमिक अंदाजानुसार एमएसईबीच्या तारा तुटून पडल्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज आहे. यामुळे कारखान्यातील ग्रॅंडिंग मशीन, मोटर, वजनकाटा आणि सुमारे ३२ टन प्लास्टिक साहित्य जळून खाक झाले असून यात एकूण १२ लाख रुपयांचे नुकसान झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toxic: यशच्या 'टॉक्सिक'ला बकवास म्हणणं प्रसिद्ध यूट्यूबरला पडलं महागात; थेट मिळाली कायदेशीर नोटीस

Fact Check : आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज, सरकारच्या अधिकृत स्पष्टीकरणाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

EPFO Update : नोकरी करणाऱ्या पती-पत्नींसाठी महत्त्वाची बातमी! लग्नानंतर EPFO खात्या संबंधित 'हे' एक काम करायला विसरलात? नंतर होईल गोंधळ

SCROLL FOR NEXT