Buldhana News Saam Digital
महाराष्ट्र

Buldhana News : होळी दिवशीच शेतकरी बाप-लेकाचा अपघात; पित्याचा जागीच मृत्यू

Buldhana Accident News : शेतातील काम आटोपून घरी जाणाऱ्या पितापुत्राच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने वेगात धडक दिली. यात पित्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.

Sandeep Gawade

Buldhana News

शेतातील काम आटोपून घरी जाणाऱ्या पितापुत्राच्या दुचाकीला चारचाकी वाहनाने वेगात धडक दिली. यात पित्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचाराकरिता संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. ऐन होळीच्या दिवशी हतेडी खुर्द शिवारानजीत ही दुर्घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. शिवाजी म्हातारजी चव्हाण (५५ वर्ष ) असे मृत पित्याचे नाव आहे. विशाल शिवाजी चव्हाण (२८ वर्ष) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, दोघं बापलेक केसापूर येथील शेतातील काम आटोपून घरी माळविहीरकडे निघाले होते. मात्र मध्येच एका कारने त्यांच्या वाहनाला धडक दिली. यात शिवाजी म्हातारजी चव्हाण यांना डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशाल गंभी जखमी झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. विशाल चव्हाण याला तात्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. चालक प्रमोद जय नारायण तुपकर (रा. काँग्रेस नगर , बुलढाणा ) याच्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT