Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana: गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराचा जीवघेणा हल्ला

गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर रानडुकराचा जीवघेणा हल्ला

संजय जाधव

बुलडाणा : मेहकर तालुक्यामधील पार्रडी येथील शेतकरी शेतामध्ये गुरे चारत असताना रानडुकराने शेतकऱ्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. यामुळे जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून बुलढाणा (Buldhana) येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. (Buldhana News Farmer)

पारडी येथील हिरालाल दासू राठोड (वय 55) हा शेतकरी (Farmer) त्यांच्या हिवरा खुर्द शिवारातील स्वतःच्या शेतामधील धुऱ्यावर गुरे चारत असताना शेतामधून रानडुकरांचा कळप धावत आला. यामुळे गुरे सैरावैरा पळाली. परंतु उभ्या असलेल्या शेतकऱ्यावर दोन डुकरांनी हल्ला चढवत डोक्यावर, कपाळावर, उजव्या डोळ्यावर नाकामधील मध्यभागी, पाठीवर नखाने हल्ला करून जखमी केले. त्यांना उपचारासाठी जानेफळ येथील प्राथमिक (Hospital) आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. वैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करत गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे त्यांना पाठविण्यात आले.

वन विभागाकडून पंचनामा

मौजे पारडी येथील पोलीस पाटील अमोल शिलार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना माहिती दिली असता वनरक्षक के. बी. धनगर यांनी शेतकऱ्यावरील रानडुकराच्या हल्ल्याची माहिती करता जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सदर शेतकऱ्याची चौकशी करून पंचनामा केला. त्याचे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाण्याला पाठवण्यासाठी सहकार्य केले. सदर अहवाल वनविभाग यांना पाठवून वन विभाग या शेतकऱ्याला तात्काळ मदत करतील अशी अपेक्षा जनता करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

धक्कादायक! कागदोपत्रीच शाळा… ४० शिक्षकांची फसवणूक, हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

Vedika Karkal: १८व्या वर्षी मिस गोवा; कन्नड, कोकणी चित्रपटातून ब्रेक; कोण आहे वेदिका करकल?

ठाकरेंचे २ खासदार अचानक शिंदेंच्या खासदाराच्या घरी, नेमकं कारण काय? राज्यात भूकंप होणार?

Crime News: बायको अश्लील व्हिडीओ पाठवतेय आणि..., पत्नीच्या विचित्र मागणीमुळे नवरा हैराण, थेट पोलीस ठाण्यात पोहचला

SCROLL FOR NEXT