Buldhana News: Saamtv
महाराष्ट्र

Buldhana News: अनर्थ टळला! विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिजवताना सिलेंडरने घेतला पेट; साहित्य जळून खाक, महिला जखमी

Shegaon News: या आगीत स्वयपाकांच्या खोलीतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे.

Gangappa Pujari

संजय जाधव, प्रतिनिधी...

Buldhana News: बुलढाणामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत खिचडी शिजवताना सिलेंडरला आग लागल्याची दुर्घटना घडली. यामध्ये खिचडी शिजवणारी महिला जखमी झाली असून सुदैवाने सिलेंडरचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेगाव तालुक्यातील जळंब या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी शिजवताना सिलेंडरने पेट घेतल्याची दुर्घटना घडली. गॅस सिलेंडरची नळी निसटल्याने सिलेंडरने पेट घेतला. या आगीत् खिचडी शिजवणारी महिला जखमी झाली असून तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.

यावेळी शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीमधील १०० विद्यार्थीनी उपस्थित होत्या. या घटनेत सिलेंडरने पेट घेतल्याने खिचडी शिजवण्याच्या खोलीला आग लागली. या आगीत खोलीतील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने सिलेंडरचा ब्लास्ट झाला नाही, त्यामुळे जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे.. (Buldhana News)

दरम्यान, याबाबतीत जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना विचारणा केली असता शिक्षणाधिकारी सुटीवर असून त्यांचा फोन बंद आहे. तर सहाय्यकांना विचारणा केला असता त्यांनी फक्त माहिती मिळाली असल्याचे सांगितले. एकूणच शिक्षण विभाग या घटनेवर फारसे गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT