Nana Patole News:  Saamtv
महाराष्ट्र

Nana Patole News: 'ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हा भाजपचाच...' कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे मोठे विधान

Maratha Aarkshan: मराठा बांधव आरक्षणासाठी आग्रही असतानाच वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी आरक्षणाविरोधात भूमिका घेतली आहे.

Gangappa Pujari

Nana Patole News:

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर मराठा बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला असून राजकीय नेत्यांना गावबंदी, सभांवर बहिष्कार टाकले जात आहेत. एकीकडे मराठा बांधव आरक्षणासाठी आग्रही असतानाच वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी आरक्षणाविरोधात भूमिका घेतली आहे. सदावर्तेंच्या या भूमिकेवर बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) सुरू असलेला लढा, भारतीय जनता पार्टीकडून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप यावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगल्याच शब्दात समाचार घेतला आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावरुन नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला.

"मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयात कोण गेलं होतं ? त्यांच्या पाठीमागे कोण होतं ? तो कुणाच्या संपर्कात आहे ? हे सर्वांनाच कळलेलं आहे.. असे नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. तसेच "दानवे साहेब आता तुम्ही किती खोटे बोलणार आहेत ? असा उलट प्रश्नही नाना पटोले यांनी केला आहे.

फडणवीस मनातून डिलीट...

शुक्रवारी सायंकाळी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) सोशल मीडिया अकाउंटवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा "मी पुन्हा येईन" हा व्हिडिओ पोस्ट करून काही वेळात डिलीट करण्यात आला. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी "फडणवीस हे लोकांच्या मनातूनच ते डिलीट झालेले आहेत, त्यामुळे आता चर्चा कशाला? असा टोला लगावला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jailer 2 Set Accident: रजनीकांत यांच्या 'जेलर 2'च्या सेटवर मोठी दुर्घटना; 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: हडपसर भागातील बॉम्ब प्रकरणी एक संशयित ताब्यात

ममता बॅनर्जी यांचा टीएमसी पक्ष फुटीच्या मार्गावर? खासदारांचा एक गट बंडाच्या भूमिकेत

Panchgani Name History: 'पाचगणी' हे नाव कुठून आलं? कोणी ठेवलं? इतिहास वाचा

Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT