Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : करिअर अकॅडमीच्या नावाने लुबाडणूक; सैन्य भरतीच्या नावाने ४० विद्यार्थ्यांकडून घेतले १ कोटीच्यावर रक्कम

Buldhana News : विद्यार्थ्यांना सैन्यात भरती करण्याचे आमिष खिल्लारे याने दिले. त्यानुसार ४० विद्यार्थ्यांकडून तब्बल १ कोटी ३४ लाख ४५ हजार रुपये घेत फसवणूक केली आहे.

Rajesh Sonwane

बुलढाणा : सैन्यात नोकरीला लावून देण्याचे अमिष दाखवत गोरगरीब विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेहेकर येथील जिजामाता करिअर अकॅडमी या नावाने सैन्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीच्या संचालकानेच हा घोळ केला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मेहकर (Mehkar) येथील जिजामाता करिअर अकॅडमीचे संचालक प्रदीप एकनाथ खिल्लारे असे मुख्य आरोपीचे नाव आहे. खिल्लारे याच्या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण दिले जात असते. लवकर नोकरी लागावी या उद्देशाने प्रशिक्षणासाठी अनेक विद्यार्थी येथे येत असतात. मात्र या गोर गरीब विद्यार्थ्यांना सैन्यात भरती करण्याचे आमिष खिल्लारे याने दिले. त्यानुसार ४० विद्यार्थ्यांकडून तब्बल १ कोटी ३४ लाख ४५ हजार रुपये घेत फसवणूक केली आहे. त्याच्यासह त्याची पत्नी पूजा खिल्लारे, आरोपीचा भाऊ प्रशांत एकनाथ खिल्लारे, वडील एकनाथ खिल्लारे, आई रत्नमाला खिल्लारे या ५ जणांना देखील पोलिसांनी (Police) आरोपी केले आहे.

फसवणूक झाल्याबाबत जिकुल्ला शेख गुलाब (वय २५) याने या प्रकरणाची तक्रार दिली आहे. त्याची स्वतः १ लाख २० हजार रुपयांनी (fraud) फसवणूक झाली आहे. खिल्लारे याने जिकुल्ला यास आर्मीमध्ये नोकरीला लावून देतो, त्यासाठी ४ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते. त्यावेळी त्याने १ लाख २० हजार रुपये खिल्लारे याला दिले होते. मात्र कोरोना लागल्यामुळे प्रशिक्षण बंद होते. कोरोना संपल्यानंतर प्रशिक्षण पुन्हा सुरू झाल्यावर जिकुल्ला शेख याने प्रदीप खिल्लारे याला नोकरी बाबत विचारणा असता माझ्यावर विश्वास ठेव, तुला डायरेक्ट ऑर्डर येईल असे प्रदीप खिल्लारे म्हणाला. मात्र त्यानंतर जिकुल्ला शेख याला माहीत पडले की प्रदीप खिल्लारे याने अशाच पद्धतीने सगळ्यांना सांगून तब्बल ४० जणांकडून पैसे उकळले असल्याचे समजताच पोलिसात तक्रार दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT