Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : ट्रॅक्टर मोर्चा प्रकरणी सुमारे १५० शेतकऱ्यांवर गुन्हा; खामगावात काढला होता मोर्चा

Khamgaon News : खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी १ जानेवारीला खामगावात ट्रॅक्टर मोर्चा

Rajesh Sonwane

संजय जाधव 

बुलढाणा : बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी १ जानेवारीला काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान पोलीस प्रशासन व (Buldhana) शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावेळी शेतकऱ्यांनी (Farmer) ठिय्या मांडत आंदोलन करत घोषणाबाजी केली. ट्रॅक्टर मोर्चा काढणाऱ्या १५० शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.  (Live Marathi News)

खामगाव (Khamgaon) तालुक्यातील बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी १ जानेवारीला खामगावात ट्रॅक्टर मोर्चा आणला होता. सदर मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचण्यापूर्वीच (Police) पोलिसांनी अडविला होता. त्यामुळे शेतकरी व पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला व अर्धनग्न आंदोलन सुरू केले होते. तसेच सरकार व पोलिसांबाबत घोषणाबाजी केली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१५० शेतकऱ्यांवर गुन्हे 

या प्रकरणी शहर पोलिसांनी सुमारे १५० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. शिवाजीराव उर्फ रावसाहेब टीकार पाटील व त्यांची पत्नी, संदीप शिवाजीराव टीकार पाटील, बंडू शिवाजीराव टीकार पाटील, बाळू खरात, मारोती तायडे, आनंद सुरवाडे, गणेश ठाकरे, ज्ञानेश्वर टीकार, हिम्मत सुरवाडे व शाम अवथळे यांच्यासह सुमारे १५० जणांविरुद्ध  गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT