Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

ST Bus Accident: ७० पेक्षा जास्त प्रवासी, चढावावरच एसटी बसचे ब्रेक फेल; आरडाओरड अन् गोंधळ; मलकापूर- सोलापूर मार्गावर अपघात

एसटी रिव्‍हर्स मागे जायला लागली. एसटीमधील प्रवाश्यांनी आरडा ओरड केली

संजय जाधव

बुलढाणा : मलकापूर– सोलापूर मार्गावरील हातनी गावानजीक एसटीचे ब्रेक फेल झाल्याने एसटी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात गेली. यात (Accident) अपघातात ६ प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. (Breaking Marathi News)

चिखलीवरून बुलढाण्याकडे राज्‍य परिवहन महामंडळाची एसटी निघाली होती. एसटीमध्ये ७० पेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते. या दरम्‍यान हातनी जवळील एसटी उंच भागातील रस्ता चढत असताना अचानक एसटीचे ब्रेक फेल झाले. यामुळे एसटी रिव्‍हर्स मागे जायला लागली. एसटीमधील प्रवाश्यांनी आरडा ओरड केली. पण चालकाच्या सावधानतेने (St Bus) बस रस्त्याच्या कडेला असलेल्‍या खड्यात जाऊन थांबली.

सदरच्‍या मार्गावर वाहनांची चांगलीच वर्दळ असते. मात्र तेवढ्या वेळात कोणताही वाहन रस्त्यावर नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातात ६ प्रवाशी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या अपघाताने (Bus Accident) पुन्हा एसटी भंगार रस्त्यावर धावत असून प्रवाश्‍यांच्या जीवाशी खेळत असल्याचे सिद्ध झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna: रश्मिका मंदान्नाने परिधान केली सुंंदर सॅटिन साडी, पाहा फोटो

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मनसे- मविआची युती झालीच, नाशिकच्या राजकारणात नवं समीकरण

GK: सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा कोणत्या देशाला आहे?

Ladki Bahin Yojana: राज्यात निवडणुकीचा धुरळा, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे ₹१५०० कधी मिळणार?

Maharashtra Live News Update : कथित कॉल रेकॉर्डिंगनंतर गंगाधर काळकुटे यांची पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी धाव

SCROLL FOR NEXT