Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : बायोडिझेल विक्रीचा गोरखधंदा! एलसीबीची कारवाई, ३१ हजार लिटर साठ्यासह ३४ लाखांचा मुद्धेमाल जप्त

Buldhana News : चिखली एमआयडीसी, मलकापूर व दसारखेड एमआयडीसी येथे एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली

संजय जाधव

बुलढाणा : राष्ट्रीय व राज्य मार्गालगत राजरोसपणे अवैध बायो डिझेलची सर्रास विक्री होत आहे. पोलीस (Police) विभागाने केलेल्या मोठ्या कारवाईत तब्बल ३१ हजार लिटर इंधन साठा जप्त करण्यात आला आहे. यात ३४ लाखांचा (Buldhana) मुद्धेमाल ताब्यात घेण्यात आला आहे. (Live Marathi News)

चिखली (Chikhali) एमआयडीसी, मलकापूर व दसारखेड एमआयडीसी येथे एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत ३१ हजार ४०५ लिटर अवैध बायोडिझेलसह एकूण ३४ लाख २० हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिखली येथील किसान बायोडिझेल, काठोडे ट्रेडर्स, मलकापूर (Malkapur) येथील हॉटेल निसर्ग व हॉटेल सहयोगजवळ, पद्मने महाराज शेताजवळ, हॉटेल अमनजवळ छापे घालण्यात आले. या ठिकाणी पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आठ जण ताब्यात 

या प्रकरणी आरोपी सचिन लोखंडे, ज्ञानेश्वर काठोडे (रा. चिखली), नफीस खान (वडणेर भोलजी नांदुरा), हेमंत काचकुरे (तालासवाडा मलकापूर), परमेश्वर वनारे (माकनेर, ता. मलकापूर), शेख जावेद, मोहमद जिया मो युसूफ, गुरफान खान गफार खान (रा. मलकापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरुद्ध भादवी कलम २८५, जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ नुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी ही कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water for weight loss: बॅलन्स डाएटसोबत प्या 'या' मसाल्याचं पाणी, वजन होईल झटक्यात कमी

High Blood Pressure : हाय बीपीचा धोका अपुऱ्या झोपेमुळे वाढतोय? काय करावं जाणून घ्या

Maharashtra weather today: महाराष्ट्रात आज वादळी पावसाचा इशारा; 24 जिल्ह्यांना येलो अलर्ट, अनेक ठिकाणी उन्हाचा चटका

Sunday Horoscope: गणेशोत्सवात बदलणार ग्रहांची चाल; या ७ राशींना मिळणार मोठा आर्थिक फायदा

शिंदे गटाच्या आमदाराने १३ तालुकाप्रमुखांना दिल्या नव्या कोऱ्या कार; शिवसेनेचा नवा फॉर्म्युला आला चर्चेत

SCROLL FOR NEXT