IPL Betting Saam tv
महाराष्ट्र

IPL Betting: आयपीएल मॅचवर सट्टा; एलसीबीने छापा टाकून तिघांना अटक करत मुद्देमाल जप्त

आयपीएल मॅचवर सट्टा; एलसीबीने छापा टाकून तिघांना अटक करत मुद्देमाल जप्त

संजय जाधव

बुलढाणा : खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा येथून जवळच असलेल्या वडजी भेंडी गावच्या शेत शिवारात (IPL) आयपीएल २०२३ च्या क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा (Online Betting) सुरू होता. या ऑनलाईन सट्ट्यावर बुलढाणा येथील एलसीबी पथकाने छापा टाकून पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

बुलढाणा एलसीबी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे शेत शिवारात सुरू असलेल्या सट्ट्यावर छापा टाकून रामसिंग विलास पवार (रा. वडजी भेंडी), अजय किसनदास बैरागी (रा. घाटपुरी नाका खामगाव) व अक्षय गणेश जुनारे (रा. गोपालनगर खामगाव) हे तिघे मोबाईल व लॅपटॉपच्या सहाय्याने आयपीएल क्रिकेट मॅचवर ऑनलाईन सट्टा खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहेत.

सव्‍वा लाखाचा मुद्देमाल जप्‍त

सट्टा लावत असलेल्‍या जागेवरून सहा मोबाईल किंमत २५ हजार, एचपी कंपनीचा लॅपटॉप किंमत ३५ हजार रूपये, पेन ड्राईव्ह, पेन व नगदी १ हजार ५५० रुपये असा एकूण १ लाख २२ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याविरुद्ध कलम १२ अ मजकुरांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Stories: 86 व्या वर्षीही काम करण्याची वेळ; हॉस्पिटलचा खर्चासाठी भागवण्यासाठी अभिनेत्याची धडपड

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

SCROLL FOR NEXT