Bee Attack Saam tv
महाराष्ट्र

Bee Attack : शिवालयात दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला; १५ भाविक गंभीर जखमी

Buldhana News : महाशिवरात्री बुधवारी उत्साहात साजरी झाली. यामुळे शिवालयांमध्ये भाविकांची दिवसभर गर्दी होती. अनेक पुरातन अशा महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने यात्रोत्सव भरविण्यात आलेला होता

संजय जाधव

बुलढाणा : महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिरात दर्शनासाठी भाविकांची दिवसभर गर्दी पाहण्यास मिळाली. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव लेंडीच्या निर्मळेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रा भरलेली होती. यामुळे येथे दिवसभर भाविक दर्शनासाठी येत होते. दरम्यान भाविकांच्या जमलेल्या गर्दीतच मधमाशांनी हल्ला केला. एकदा नव्हे तर दोन वेळेस हा हल्ला केल्याने यात असंख्य भाविक जखमी झाले आहेत.  

महाशिवरात्री बुधवारी उत्साहात साजरी झाली. यामुळे शिवालयांमध्ये भाविकांची दिवसभर गर्दी पाहण्यास मिळत होती. तर अनेक पुरातन अशा महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने यात्रोत्सव भरविण्यात आलेला होता. त्यानुसारच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर ते जालना रोडवरील पिंपळगाव लेंडी फाट्यावर असलेल्या निर्मळेश्वर संस्थानवर यात्रा भरविण्यात आलेली होती. यात्रा असल्याने याठिकाणी भाविक मोठ्या संख्येने आलेले होते. 

मधमाशांचा दोन वेळेस हल्ला 

दरम्यान यात्रोत्सवात भाविकांची गर्दी जमलेली असताना मंदिर परिसरातील झाडावर बसलेल्या आग्या मोहोळाच्या मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला. यात बुधवारी सकाळी दहा वाजता आणि दुपारी तीनच्या सुमारास असे दोनदा मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात असंख्य भाविक जखमी झाले आहे. यावेळी मधमाशांनी अचानक हल्ला केल्याने यात्रेत मोठा गोंधळ उडाला होता, भाविकांमध्ये देखील धावपळ उडाली होती. 

पंधराजण गंभीर जखमी 

मधमाश्यानी केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. यातील पंधराजण गंभीर जखमी आहेत. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वारांनाही मधमाशांनी चावे घेत जखमी केले. यावेळी मधमाशांना पांगविण्यासाठी एका टिप्परमध्ये कचरा जाळून धूर करण्यात आला. तर हल्ल्यात जखमी झालेल्यांवर जालना येथील खासगी रुग्णालयात तर काहींवर सिंदखेडराजा येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

लग्नासाठी १४ कोटींचा पॅलेस बुक; होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवशी ट्रेकिंगला गेलेल्या बिल्डरच्या मुलाचा मृत्यू, लोहगडावर नेमकं काय झालं?

PM Kisan Yojana : शेतकऱ्याच्या खात्यावर किती वाजता जमा होणार ₹२०००? पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आली समोर

पुण्यात रक्तरंजित थरार; नराधमाने 'लिव्ह-इन पार्टनर'च्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

Haunted Fort : भारतातील ५ सर्वात भयानक अन् रहस्यमय किल्ले, सूर्यास्तानंतर येथे जाण्याची कोणी हिंमतच करत नाही

SCROLL FOR NEXT