ATM Crime Saam tv
महाराष्ट्र

ATM Crime : गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Buldhana News : एका आलिशान कारमधून आलेले हे चोरट्यांनी अतिशय शांततेने गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडलं

संजय जाधव

बुलढाणा : रात्रीच्या सुमारास एटीएम मशीन फोडीच्या घटना नवीन राहिल्या नाहीत. असाच प्रकार बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील शेंबा या गावाच्या मुख्य महामार्गावर घडला आहे. येथील एटीएम (ATM) मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून यातील लाखो रुपयांची रोकड लांबविली आहे. (Tajya Batmya)

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील शेंबा या गावाच्या मुख्य महामार्गावर असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे (Bank) एटीएम आज सकाळी चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी फोडून लाखोची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे एका आलिशान कारमधून आलेले हे चोरट्यांनी अतिशय शांततेने गॅस कटरच्या सहाय्याने (ATM Crime) एटीएम फोडलं. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली असून चोरटे रोकड घेऊन पसार झाले आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अलार्म वाजल्याने गावकरी सतर्क

चोरटे एटीएम फोडत असताना एटीएमचा इमर्जन्सी अलार्म वाजल्याने तात्काळ गावातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. वीस मिनिटातच पोलीस ही घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत चोरट्यांनी काळ्या रंगाच्या कारमधून पोबारा केला. पुढील तपास बोराखेडी पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aircraft navigation lights: रात्रीच्या वेळी विमानावर निळे आणि लाल लाईट्स का लावले जातात?

Farmer suicide : अधिकाऱ्याची धमकी, पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याची आत्महत्या, संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Soyabean Crop : अस्मानीसोबत सुलतानी संकटाने शेतकरी मेटाकुटीला; ८ एकरवरील सोयाबीनला ना फुल ना शेंगा, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

Maharashtra Live News Update: २४ तासांच्या आत आरोपीला शोधा, राज ठाकरेंची पोलिसांकडे मागणी

Better Half Chi Love Story : 'बेटर-हाफ ची लव्हस्टोरी' घरबसल्या पाहा; सुबोध भावेचा चित्रपट ओटीटीवर, वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT