Anganwadi Workers Saam tv
महाराष्ट्र

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांचे धरणे; राज्य शासनासह मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी

संजय जाधव

बुलढाणा : अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यासाठी संप पुकारला आहे. मात्र सरकारने अद्याप दखल (Buldhana) घेतली नसल्याने या विरोधात अंगणवाडी सेविकांनी सीटु संघट्नेतंर्गत मोताळा येथे धरणे आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान राज्य सरकार व मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Maharashtra News)

राज्यामध्ये संपूर्ण अंगणवाडी सेविका (Anganwadi Workers) गेल्या एका महिन्यापासून संपावर असून त्यांच्या विविध मागण्यासाठी संप सुरु केला आहे. मात्र राज्य सरकारने अद्यापही त्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे आता मुंबईच्या आंदोलनानंतर आता त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन चालू केले आहे. धरणे आंदोलनामध्ये अंगणवाडी सेविका संघटना सीटू यांनी हे मोताळा येथील प्रकल्प कार्यलय येथे सीटू अंगणवाडी संघटच्या जिल्हा सचिव प्रतिभा पाटील यांच्या नेतूत्वात धरणे आंदोलन सुरु केले. 

लढा सुरूच राहणार 

धरणे आंदोलन ८ ते १२ जानेवारी २०२४ दरम्यान सुरू राहणार आहे. जोपर्यत मागण्या मान्य होत नाही; तो पर्यंत असाच लढा सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. यावेळी अंगणवाडी सेविका यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, आदिती तटकरे यांच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी केली. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Sara Ali Khan Networth: 'पतौडी' घराण्यात जन्मली सारा; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकित

Vande Bharat Train : छत्रपती संभाजीनगरात बनणार वंदे भारत ट्रेनचे पार्ट्स; शेंद्रा एमआयडीसीत ज्युपिटर व्यागोंकाची १०० कोटीची गुंतवणूक

SCROLL FOR NEXT