Buldhana News Saam tv
महाराष्ट्र

Buldhana News : जप्त केलेला तब्बल ४५९ किलो गांजा नष्ट; बुलढाणा जिल्ह्यात पोलिसांची कारवाई

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांकडे दाखल गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला गांजा अंमली पदार्थ गोदामात ठेवण्यात आला होता.

संजय जाधव

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत पकडलेला (Buldhana) तब्बल ४५९ किलो गांजा नष्ट करण्यात आला. खामगाव (Khamgaon) शहरातील एमआयडीसी भागातील वाईज इन्फोकेअर अँड फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काल दिवसभरात हा गांजा नष्ट करण्यात आला. (Maharashtra News)

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांकडे (Police) दाखल गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला गांजा अंमली पदार्थ गोदामात ठेवण्यात आला होता. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे काय करायचे याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरु होती. न्यायालयीन स्तरावर पाठपुरावा करून याबाबत पोलिसांनी नष्ट करण्याबाबत अखेर आदेश मिळविल्यानंतर हा गांजा खामगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील वाईज इन्फो केअर अँड फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये नष्ट करण्यात आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सदर प्रक्रिया सुरू असताना प्रदुषण होणार नाही व आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होणार नाही; याबाबत सर्व दक्षता घेण्यात आली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत सातव, आर्थिक गुन्हे शाखा पथक ठाणेदार अशोक लांडे यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT